मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Nitin Markale Talk लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

Vastu for Entrance and Main Door

 Vastu for Entrance and Main Door Main Door Direction in Vedic Vastu Shastra   Main Door The main door of the house should be larger than the other doors entering the house. The main door should have two shutters and open to the inside of the building. Teak is a good material for the entrance door. It is best that a house has two entrances. The exit door should be smaller than the entrance, and it should have only one shutter. If there are two external doors for the house, they should not be set in a straight line. When one enters the house, there should not be a wall in front of the entrance. There should be a door that opens to the next room. A shadow should not fall on the main door. The main door of the house should not be below ground. Neither should the main door be in the center of the house, nor in the extreme corners. If the door is set in the north wall, move it east of center; if it’s in the east wall, move it north of center. If it is set in the south wall, it shou...

भुमी परीक्षण

भुमी परीक्षण  प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर सजवायला व बांधायला आवडत . आपलं घर जगापेक्षा वेगळं हटके असावं असं सुद्धा आपल्यातील बरेच जणांना वाटत . प्लॉट खरेदी करते वेळी वास्तुशास्त्रातील नियम आपल्या घराला लागु होतील का नाही हि भीतीसुद्धा असते. कधीकधी या पुरातन शास्त्राचा सल्ला न घेतासुद्धा बांधकाम केल्या जातात. बांधकाम केल्यावर मग मात्र निसर्गनियमानुसार फळ मिळतात. वास्तुशास्त्रात ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे ती जागा कशी असावी किंवा ती जागा कशी निवडावी याविषयी विस्तृत सखोल माहिती उपलब्ध आहे.  जो भुखंड आपल्याला घर बांधकामासाठी खरेदी करायचा आहे त्याचे भु- परीक्षण वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. वास्तु दोष आढळल्यास घर बांधकाम करायच्या आधी उपाय योजना करावी. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्याना सामोरे जावे लागू शकते.  आनंदी वास्तु तेव्हाच कार्य करते जेव्हा आपले घर वास्तु नियमामध्ये असेल.  भु - परीक्षण कसे करावे ? वास्तुशास्त्र मध्ये अनेक प्राचीन ग्रंथातून याविषयी अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास सांगितला आहे . भूखंडाचा आकार , मातीचा रंग , गंध , स्पर्श , चव यावरून भूमीचे विव...

Vastushastra करावे व करू नये Basic do and don't

Vastu shastra करावे व करू नये  नमस्कार वाचकहो आपण पाहणार आहोत कि , घरामध्ये जर वास्तुशास्त्राचे संपूर्ण फायदे घ्यायचे असल्यास काय करावे व काय करू नये . कष्टाने मेहनतीचे घर बांधलेले असते . त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम एकमेकाला मिळणे . व प्रत्येकाची आर्थिक , सामाजिक प्रगती होणेसाठी वास्तुशात्र गरजेचे असते .              आज आपण अश्याच काही गोष्टी माहित करून घेणार आहोत . या लहान लहान गोष्टीतून आर्थिक भरभराट मात्र नक्कीच होऊ शकते . कधीकधी या सर्व आवश्यक गोष्टी घरात आपल्याला माहित असतात पण आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत नसल्यामुळे मोठ्या वास्तुदोषांना सामोरे जावे लागते . रंग , आकार, दिशा यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातून प्रत्येक वस्तूचा वास्तु शास्त्रामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो . म्हणून भगवत गीतेत श्री भगवान श्रीकृष्ण युक्त आहार विहाराचे महत्व सांगतात . चला तर मग जाणून घेऊया वास्तुटीप्स आणि आपणही आपली प्रगती करूया .  वास्तु उपाय  १) घराचे बाहेर तुळस नक्की लावावी .  २) तुळस समोर शुभ लक्षणांनी युक...

What is the true definition of a friend?

मित्र  मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते.  माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.              काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.               मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.        ...

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi    लिखाणाचे बरेच फायदे आहेत तुमच्या डोक्यात जे काही विचार येतात ते एखादे वेळी त्रासदायक असतात. यातून आरोग्य बिघडू शकते. हे विचार कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असतात. त्यामुळे जर ते काही आपल्या डोक्यात सुरु आहे ते कागदावर लिहून ठेवावे. कागदावर ठेवल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे  मेंदूला हलके वाटायला लागेल. जास्त त्रास जाणवणार  नाही. मी हा उपाय माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खुद्द करून पाहाल  आहे. यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नसते. बस काही पान  घ्या, नेहमीचा पेन घ्या , तुमचे नेहमी चे बसण्याचे ठिकाण चालेल. अगदी गोंधळ गोंगाटाच्या ठिकाणी  असले तरीही चालेल. मी व लोणार सरोवर येथील शिवमंदिर                                                   आता असं समजा की तुमच्या समोर एक तुमच्यापेक्षा लहान मित्र बसला आहे. आणि त्याला तुम्ही काहीतरी आलेला अनुभव सांगत आहे. तुम्ही विचार...

व्यवसायात यशस्वी होण्या साठी Chanakya Niti- how to success in business

व्यवसायात यशस्वी होण्या साठी  नवीन ओळख झाल्यावर एखाद्याची नीट चौकशी करण्याच्या आधीच आपण आपल्या Idea लोकांना Share करण्या आधीच पैश्याच बोललो तर बर पडते . यातून राग येत नाही. वेळ वाया जात नाही. महत्वाच म्हणजे समोरच्याला आपला concept समजत नाही. काही लोक व्यवसायात अतिशय चिकट व कंजूष असतात.  असे लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याची क्षमता स्वतःजवळ बाळगतात. त्यामुळे अश्या हुशार लोकांना तोंडी जरी तुमच्या व्यावसायिक Idea मिळाल्या  तरी त्यांच्यासाठी फायदा करून देणार असत.       म्हणून कदाचित आचार्य चाणक्य यांनी सांगितलं असेल आपल्या योजना नेहमी गुप्त ठेवा . how to success in business १) आर्थिक नुकसान                 सर्वाना माहीतच आहे कि आचार्य चाणक्य प्राचीन भारतामधील राजकारण व अर्थशास्त्र यामधील प्रसिद्ध विद्वानांमधील एक आहेत. चाणक्य यांनी चार गोष्टी जे नेहमी गुप्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत . आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या वेळी व्यवसायातून व्यापारातून आपल्याला आर्थिक नुकसान अर्थ हानी झाली असेल. तर अशी गोष्...

दुर्गा नवरात्र चवथा दिवस Fourth day Navratra

दुर्गा नवरात्र चवथा दिवस  Fourth day Navratra                             नवरात्रीत नऊ दिवस भाविक भक्त दुर्गा देवीची विविध रूपांमध्ये पूजा अर्चना करतात. यामध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्री Sheilputri , दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी Bramhcharini  , तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा Chandraghanta माता रूपाने पूजन करतात. चवथ्या दिवशी आई कुष्मांडाची Kushmanda  पूजा केली जाते.  मातेने या स्वरूपात जगाची निर्मिती केली आहे . कुष्मांड म्हणजे भोपळा सर्व ब्रह्मांड एक मोठा भोपळा आहे आणि देवीला अर्पण करण्यासाठी विशेष आवड असलेलं फळ भोपळा आहे. माता कुष्मांडा सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. सूर्य या देवीचे निवास स्थान आहे. यामुळेच आई कुष्मांडा देवीच्या मागे सूर्याचे तेज दाखविल्या जाते . माता सिहावर बसली असून आठ हाताची अष्टभुजा आहे.                           नवरात्री मध्ये चवथ्या दिवशी मातेला कुष्मांडा या रूपात पूजन करतात. आईने आपल्या स्मित ...

दुर्गा नवरात्र तिसरा दिवस Navratri Third Day

दुर्गा नवरात्र तिसरा दिवस Navratri Third Day चंद्रघंटा माता Chandraghanta Mata       नवरात्री   मध्ये नऊ दिवस भाविक भक्त विविध नऊ रूपांमध्ये देवीची उपासना करतात . तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा  Chandraghanta Mata  पूजन केल्या जाते. दुर्गा देवीचे हे स्वरूप भक्तांना शांतीदायक व कल्याणकारक आहे . मातेच्या कपाळावर अर्ध चंद्र सुशोभित आहे. चंद्रघंटा मातेला १० हात असून आठ ८ हातात विविध आयुधे आहेत. व शेवटच्या डाव्या व उजव्या हाताने माता भक्तांना आशीर्वाद देत आहे. देवीचा सुवर्ण रंग आहे . पिवळा रंगाची आभा आहे.         चंद्रघंटा देवीला स्वरांची देवी समजण्यात येते. चंद्रघंटा   मातेला सुवर्ण सम पीत वर्णाची आहे. देवीला तीन डोळे व दहा हात आहेत. आईच्या हातात गदा , बाण, त्रिशूल, धनुष्य, खडग, खापर, चक्र  आणि इतरही अस्त्र शस्त्र आहेत. चंद्रघंटा माता अग्नी सारखी वर्णाची , ज्ञान व गुणांनी परिपूर्ण आहे. देवी सिंह सवारी करीत असून युद्धाची मुद्रा आहे.                 चंद्रघंटा मातेचे हे...

दुर्गा नवरात्र पहिला दिवस

दुर्गा नवरात्र पहिला दिवस  शैलपुत्री माता  नवरात्र मधील मातेच्या नऊ रूपांपैकी शैलपुत्री मातेला भाविक भक्त प्रथम रूपात पूजा अर्चा करतात. नवरात्र मधील पहिला  दिवस शैलपुत्री मातेचा असतो.  नऊ  दिवस विविध नऊ देवी रूपांचे दुर्गा पूजन भाविक करतात. माता शैलपुत्री प्रथम रूपात पूजन केल्या जाते त्या आधी नवरात्र घटस्थापना केल्या जाते . शैलपुत्री  मातेचे रूप असे आहे कि, माता नंदी वर विराजमान आहे.  म्हणजे वाहन नंदी आहे . डाव्या हातात कमळ व उजव्या हातात त्रिशूल घेतले आहे. मातेच्या कपाळावर अर्ध चंद्र अलंकृत आहे. " शैलपुत्री " या शब्दाचा अर्थ पर्वताची मुलगी असा होतो संस्कृत मध्ये पर्वताला शैल असेही म्हणतात. यासंबंधी असलेल्या पौराणीक कथा मध्ये सांगितले आहे कि , आधीच्या जन्मात शैलपुत्री माता दक्ष राजा ची कन्या होती. तिचे आधीच्या जन्मिचे नाव "  सती " असे होते . सतीने घोर तपश्चर्या करून शिव शंकराला प्रसन्न केले होते . व त्यांनाच पती म्हणून स्वीकार केले होते . शंकराची अर्धांगिनी म्हणजेच माता सती होय. एकदा महाराज प्रजापती दक्ष ...

आराम व विचार

आराम व विचार                    झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो.  किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता  असते .  त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते .  मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी .  एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये.  दिवसा झोपू नये व रात्री जागु नये .  दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा.  ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा .  जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका .  मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा.                                 ...

सुख आणि दुःख

सुख आणि दुःख                          खूप दिवस झाले Social Media  वर online राहतो पण मन शांत होत नाही . जास्तीत जास्त व्यथीत होते . लाख लोकांना होणारा आनंद यातून दिसते म्हणून नाही तर करोडो लोकांचे दुःख हि पाहता येते म्हणून. यावर हजारो मित्रांना एकाच वेळी मित्र बनवता येते . आयुष्यात कधीच न भेटता पण आपल्याला खूप मित्र मैत्रीणी या तयार करता येतात . त्यांचे सुख दुःख माहित करुंन घेता येतात , पण उपयोग काय ?????                       आपल्या घरात आपण एकटेच असतो . घराच्या दरवाज्यात तर कोणताच मित्र उभा नसतो . अश्या वेळी वाटते नक्कीच कुठे तरी काहीतरी चुकत आहे . आज आपल्याला Friend शोधावे लागतात आपल्या इनबॉक्स मध्ये आणि त्यांच्या समस्या माहित होतात आलेल्या Notification मध्ये . हा सगळं मायाजाल आहे . एखाद्याला थोडं जरी दुःख झालं , कोणाला घरी करमत नसेल असं एखाद्या न फक्त लिहायचा अवकाश कि , सहानुभूतीची जणू स्पर्धा सुरु होते . घरातील आई वडील भाऊ बहीण यांची घेत नसेल इतकी ...

झोपेतून उठल्यावर

झोपेतून उठल्यावर                                        वास्तुशास्त्रानुसार दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठल्यावर घरामध्ये देवाचे नाव स्तुती रूपाने घेण्याला विशेष महत्व आहे. सकाळी सकाळी ईश्वराचे चिंतन करावे . त्यासाठी खाली काही नित्य उपयोगी मंत्र व स्तोत्र देत आहे . याच्या नियमित वाचनाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते . व घराला अध्यात्मिक ऊर्जा मिळते .  वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।  निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।  शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।  विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।  वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।  कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।  प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।।  या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।  या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।  या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृ...

केलं तेवढं कमीच

केलं तेवढं कमीच   खूप जुनी गोष्ट आहे , एकदा एका गावात एक भला माणूस राहत होता . तो सर्वांच्या मदतीला धावून जात असे . असं समाजा कि हि त्याची सवयच होती . सवयच असल्या मुळे कोणी सांगो अथवा न सांगो तो जो कोणी संकटात दिसेल त्या साठी आपल्या हाती असलेले काम सोडून पडत सुटायचा . काही लोक त्याचे आभार मानत तर काही लोक हि त्याची सवयच आहे असं समजून साधं आभार पण मानत नसत . त्यामुळे त्याच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितले होते कि तुला जास्त या लोकांच्या कामी पडू नको म्हणून .        पण चांगल्या सवयी कितीही यातना देणाऱ्या असल्या तरी त्या माणसाला एक समाधान देऊन जात असतात . असच झालं एके दिवशी , एक लहान मुलगा विहिरीत पडला . तो या  भल्या माणसाला दिसला . याला त्या लहान मुलाची दया आली . तो विहिरीजवळ आला आणि क्षणाचा विचार न करता त्याने विहिरीत उडी घेतली . तो लहान मुलगा जिवाच्या आकांताने कासावीस झालाच होता . त्याला तर जणू देवच भेटला . या माणसाने मोठी धडपड करून त्या मुलाचे प्राण वाचवले .               आता ...

Volition संकल्प

संकल्प   संकल्प करणे आणि संकल्प विसरणे दोन्हीही खूपच सोपी झालं आहे. नवीन वर्ष्याच्या पहिल्या दिवशी तर सकाळपासून संध्याकाळ पर्यंत सारेच उठसुठ संकल्प करत सुटतात.            म्हणजे पहा कस जगात जे काही चांगलं आहे ते प्रत्येकाला करावं वाटते. तस राहावं वाटते . म्हणजे त्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या जवळ असल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटते. आणि असं फक्त एक सेकंद साठी वाटत नाही . २ दिवस ४ दिवस एक आठवडा तीन आठवडे खूप दिवस त्यावर चर्चा होतात. या सर्व गोष्टीत वेळ वाया गेलेला असतो उदा . - आपण विचार करतो कि जिम लावायचा. मग जर जिम मला लावायचा असेल तर मी आधी सर्व ठिकाणी वाचून म्हणजे पुस्तकात इंटरनेट वर युट्युब वर सगळी कडे पाहून वेळ कोणता घ्यावा , सकाळ कि संध्याकाळचा हे निश्चित करेल ( म्हणजे गेला एक आठवडा वाया फुकट ). केला सकाळचा टाइम फिक्स कि सकाळी जिम ला जाण्याचे थोडे जास्त फायदे आहेत. म्हणून सकाळी लवकर उठाव लागेल हा फायदा. घरी सर्वाना सांगितलं काय    .... .... सकाळी उठण्याचे फायदे.  मग जिम चा शोध घेणार ज्यांचे ज्यांचे कॉन्टॅक्ट इंटरनेट वर आहे...

तथास्तु म्हणेल वास्तू Nitin Markale Talk

तथास्तु म्हणेल वास्तू  ॥ॐ॥  वास्तुशास्त्रामध्ये वास्तू पुरुषाला खूप मोठे महत्वाचे स्थान आहे. एका कथेनुसार ( मत्सपुराण २५२/५-१९) भगवान शिवाने घरातील व्यक्तींना त्यांनी देवतांना समर्पित केलेल्या प्रसादाच्या आहुतीला प्रसन्न होऊन वास्तुपुरुष  " तथास्तु "  म्हणेल असा प्रसंग आला आहे. वैदिक साहित्यात आलेला किंवा मांडलेला हा प्रसंग कोणत्याच कारणाने चुकीची वाटत नाही . ॐ                                   कारण ज्या घरात सतत कटकटी , भांडण , कुटुंबातील व्यक्तींचे एकमेकांबद्दल मन साफ नसणे , एकमेकाला उलटून बोलणे या गोष्टी वास्तुदोष असलेल्या घरात सतत होत असतात.  आणि त्या सर्वाला साक्षी राहून त्यांच्या वादाला वास्तू पुरुष हा तथास्तु म्हणत असावा . आज आपण पाहतो कि आपल्याकडे एक नवीन व्यावसायिक कोर्स आला आहे " Law of Attraction " म्हणजे तुम्ही जो विचार करता ती गोष्ट सतत केल्यास एक दिवस वर्तमानात आपल्या समोर येते . म्हणजेच जर आपण नेहमी चांगले विचार सोबत घेऊन जगात वावरत असू तर आपल्या सोबत...

दैवी शक्ती गाडगे बाबांची नितीन मरकाळे Talk

नमस्कार मित्रांनो                      आज आपण पाहणार आहोत कि परमेश्वरीय शक्ती जिचा उल्लेख नेहमी दैवी शक्ती म्हणून केला जातो अश्या व्यक्तिमत्वा बद्दल . दैवी शक्ती ज्याला मिळाली किंवा ज्याच्या जवळ आहे . अशी व्यक्ती अजून तरी मला दिसली किंवा भेटली नाही (भविष्यात कधी भेटल्यास सांगता येत नाही ). आणि दैवी शक्ती पाहिलेला व्यक्तीही अजून कोणी संपर्कात आला नाही. त्यामुळे जर मला कोणी कधी दैवी शक्ती ची व्याख्या करायला सांगितली , तर मी म्हणेल " एक अशी शक्ती जी सकारात्मक कार्य म्हणजे मानवी कल्याणाचे कार्य आपल्या अचाट सामर्थ्यांने करते तिला दैवी शक्ती असे म्हणतात" .                     वर सांगितल्या प्रमाणे मी माझ्या जीवनात जरी अश्या कोणत्या व्यक्तीला भेटलो नसलो तरी इतिहासात काही व्यक्ती असे नक्कीच भेटतात कि,त्यांच्या जवळ काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळी आलौकिक शक्ती होती. जिचा उपयोग त्यांनी लोकांच्या सुखासाठी व दुःख कमी करण्यासाठी केले. त्यांनी केलेले कार्य सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला झेप...

नितीन मरकाळे Talk on Vastushastra 1

वास्तुशास्त्र १ हडप्पा येथिल स्नानगृह  सिंधू नदीच्या खोऱ्यात भारतीय उपखंडात असलेली वास्तू आणि शहर रचना यांची विकासावस्था आढळून आली आहे. आतापर्यंत एक असा समज संशोधकांमध्ये होता, कि सिंधू संस्कृती साधारणतः ५५०० वर्ष जुनी असेल. परंतु आता एका नवीन शोधाद्वारे हे सिद्ध  करण्यात आले कि , हि सभ्यता साधारण पणे ८००० वर्ष आधीची आहे . म्हणजेच या प्रकारे भारतीय वास्तुशास्त्र आणि नगर रचणे ची परंपरा ८००० वर्ष इतकी आधीची असल्याचे दिसून येते.  संशोधकांनी दावा केला आहे कि , सिंधू संस्कृती मध्ये प्राप्त झालेले मातीचे भांडे ६००० वर्ष व त्याही आधीचे आहेत. हि सभ्यता भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात व त्यापासून पुढे सरस्वती नदी पर्यंत भारतातील खूप मोठ्या भूभागावर वास्तव्यास होती. सिंधू संस्कृती  खराब वातावरणामुळे येथील नागरिकांनी स्थलांतर  केले. शहरे रिकामी झाली.  धन्यवाद  नितीन मरकाळे  भ्रमणध्वनी- ८४०८९४३९९३ 

नितीन मरकाळे Talk

" भित्यापाठी ब्रम्हराक्षस " मनोरंजनासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे म्हणजे अप्पलपोटे पणाचा प्राथमिक प्रयत्न होय . दुसऱ्या साठी पर्याय  बनून जीवन जगू नका , तर त्याला इतकं जवळ करा त्याच्यासाठी तुम्ही एकमेव पर्याय असायला पाहिजे . प्रत्येकाला दुसऱ्याच काय सुरु आहे कसं सुरु आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अरे कधी कधी आपण आपल्यात पण डोकावून पहा . Correct करण्यासारखं बऱ्याच गोष्टी आपल्यात पण राहून गेल्या आहेत. Perfect होण्याचा प्रयत्न करा , स्वतः स्वतःचे निंदक व्हा .. मग पहा Success तुमच्या पासून खूप लांब नसेल.  एक आपल्या मराठी भाषेत म्हणं आहे . " भित्यापाठी ब्रम्हराक्षस " म्हणून कधीच विनाकारण भीती बाळगू नका . नवीन गोष्ट जर आपल्या मेहनत च्या पैश्याने घेतली व एखादा तिऱ्हाईत लबाड धुर्त माणसाने जर आपल्या मनात भरून दिले कि अमुक वस्तू तुझ्या साठी ठीक नाही तर असलेल्या परिस्थितीतून लांब पळायचे प्रयत्न करू नका. याउलट देवावर व आपल्या सत्कर्मावर विश्वास ठेवा. आपला कर्मयोग सुरु ठेवा. म्हणून कधीच विसरू नका .... " भित्यापाठी ब्रम्हराक्षस ". ...