केलं तेवढं कमीच
खूप जुनी गोष्ट आहे , एकदा एका गावात एक भला माणूस राहत होता . तो सर्वांच्या मदतीला धावून जात असे . असं समाजा कि हि त्याची सवयच होती . सवयच असल्या मुळे कोणी सांगो अथवा न सांगो तो जो कोणी संकटात दिसेल त्या साठी आपल्या हाती असलेले काम सोडून पडत सुटायचा . काही लोक त्याचे आभार मानत तर काही लोक हि त्याची सवयच आहे असं समजून साधं आभार पण मानत नसत . त्यामुळे त्याच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितले होते कि तुला जास्त या लोकांच्या कामी पडू नको म्हणून .
पण चांगल्या सवयी कितीही यातना देणाऱ्या असल्या तरी त्या माणसाला एक समाधान देऊन जात असतात . असच झालं एके दिवशी , एक लहान मुलगा विहिरीत पडला . तो या भल्या माणसाला दिसला . याला त्या लहान मुलाची दया आली . तो विहिरीजवळ आला आणि क्षणाचा विचार न करता त्याने विहिरीत उडी घेतली . तो लहान मुलगा जिवाच्या आकांताने कासावीस झालाच होता . त्याला तर जणू देवच भेटला . या माणसाने मोठी धडपड करून त्या मुलाचे प्राण वाचवले .
आता तुम्ही म्हणाल यात कुठे आलं "केलं तेवढं कमीच " , तर झालं असं कि त्या मुलासोबत खेडणाऱ्या लहान मित्रांनी हि बातमी गावात सांगितली . त्या लहान मुलाची आई धावतच विहिरीजवळ आली . तीन मुलाला आपल्या जवळ घेतलं त्याला निरखून पाहाल . आणि तीन विचारलं विहिरीतून माझ्या पोराला बाहेर कुणी काढलं . तसा तो माणूस गर्दीतून समोर आला . तर ती बाई सरळ त्या माणसावर रागानं धावून गेली . आणि म्हणाली, " माझं पोर खेडायला घराबाहेर पडलं तेव्हा त्याच्या डोक्यावर एक पांढरी टोपी होती , आता ती नाही आहे म्हणजे ती टोपी तूच विहिरीत टाकून दिली "
'
'
'
'
'
'
यालाच म्हणतात मित्रांनो " केलं तेवढ कमीच " . त्या माणसाने त्या बाईच्या मुलाचा जीव वाचवला . एव्हढी मोठी गोष्ट झाल्यावर पण त्या बाई त्या माणसाला दोष देतात कि , विहिरीतून टोपी का नाही काढली म्हणून .
आपणही आपल्या जीवनात अश्याच काही स्वार्थी लोकांना सोबत घेतले असते . त्यांना वेळीच ओळखा व होणाऱ्या मानसिक त्रासातून वाचा .
आपला
नितीन पाटील मरकाळे
वास्तु सलाहकार
भ्रमणध्वनी - ०८४०८९४३९९३
अकोला .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा