प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन
वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे. त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि ,
१) पूर्व
२) पश्चिम
३) उत्तर
४) दक्षिण
वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.
वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे. त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.
वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि ,
१) पूर्व
२) पश्चिम
३) उत्तर
४) दक्षिण
वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम - मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३
![]() |
| वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता |
१) ईशान्य ( उत्तर - पुर्व )
२) आग्नेय ( दक्षिण - पुर्व )
३) नेऋत्य ( दक्षिण - पश्चिम )
४) वायव्य (उत्तर - पश्चिम )
या उपदिशा आहेत.
याठिकाणी आपण याबद्दल व्हिडिओ पाहू शकता.
प्राचीन वास्तुशास्त्र ग्रंथांमध्ये दिशा निर्धारण करण्यासाठी उपाय सांगितले आहेत. यासाठी सूर्याच्या मदतीने दिशा निर्धारण केल्या जाते. वास्तुशास्त्राच्या ग्रंथांमध्ये दिशा योग्य ठरवण्यासाठी एक विधी सांगितली आहे. ज्या प्लॉटवर म्हणजेच भूखंडावर घर बांधायचे आहे त्या प्लॉट चा मध्य काढा. १२ बारा अंगुल उंच लाकडाचा शंकु घ्या. प्लॉट च्या मध्ये २४ च्योवीस अंगुल गोल वर्तुळ वृत्त काढा. सुर्योदय वेळी काढलेल्या वर्तुळ रेषेला शंकूच्या टोकाची सावली स्पर्श करेल त्या जागी चिन्ह मार्क करा. याप्रमाणेच संध्याकाळी सुर्यास्त होण्या काही वेळ अगोदर , वर्तुळाला शंकूच्या टोकाची सावली जिथे स्पर्श करेल ती जागा चिन्हित करा. मिळालेले २ दोन बिंदू आपल्याला पश्चिम आणि पूर्व दिशा सुचवतात. याप्रमाणे दोन्ही बिंदू जोडून घ्या आपल्याला पूर्व पश्चिम लाईन मिळेल. यानंतर बाकीच्या दिशा कोण वापरून मिळू शकतात.
वरील दिशा निर्धारणाचा उपाय जुना आहे. यामध्ये वेळ लागतो. शंकूवर सकाळ संध्याकाळ एका निश्चित वेळेत लक्ष ठेवावे लागते. आधुनिक काळात यासाठी दिशादर्शक वापरतात. दिशादर्शकामधे ३६० अंश मध्ये वर्तुळाकार असते. वास्तुशास्त्रानुसार दिशा कशी ठरवतात. वास्तुशास्त्र नुसार आठ दिशा आहेत.
प्रत्येक दिशेचा विस्तार ४५ अंश असतो. अश्याप्रकारे आठ दिशा ३६० अंश वर्तुळाकार चकती वर दिशादर्शकात दाखवलेल्या असतात. त्यामध्ये असलेली चुंबक सुई नेहमी उत्तर दिशा दर्शविते. यामध्ये प्रत्येक दिशेला अंश कसे व किती मिळतात ते आपण खालील चार्ट वरून समजावून घेऊ.
| दिशा | प्रारंभ अंश | मध्य अंश | शेवट अंश |
| उत्तर | ३३७.५ | ० | २२. ५ |
| ईशान्य | २२. ५ | ४५ | ६७. ५ |
| पुर्व | ६७. ५ | ९० | ११२. ५ |
| आग्नेय | ११२. ५ | १३५ | १५७. ५ |
| दक्षिण | १५७. ५ | १८० | २०२. ५ |
| नैऋत्य | २०२. ५ | २२५ | २४७. ५ |
| पश्चिम | २४७. ५ | २७० | २९२. ५ |
| वायव्य | २९२. ५ | ३१५ | ३३७. ५ |
वरील प्रमाणे आपण प्रमुख दिशा त्यांच्या उपदिशा व त्यांचा ३६० अंशावर वृत्ताकार विस्तार पाहिला.
आपल्या वास्तु संबंधी समस्या साठी आपण व्हाट्सअँप च्या माध्यमातून विचारू शकता. https://wa.me/918408943993
धन्यवाद
नितीन मरकाळे
वास्तु शास्त्र सल्लागार
०८४०८९४३९९३

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा