मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा 

2bhk house plan
घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात. 

ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck 


साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,


 संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे


१) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल


२) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा


३) ईशान्येला नेहमी उतार असावा


४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये


५) या कोपऱ्यात संडास कचराकुंडी, संडासची टाकी ,चप्पल , जिना , विजेचा मीटर , मोठी झाडे स्वयंपाकघर , वाहनतळ असणे अशुभ


६) वास्तूमध्ये ईशान्य दिशा कट असल्यास अशी वस्तू घेऊ नये अथवा योग्य उपाय ताबडतोब करावेत अश्या जागी वंशनाश होतो दारिद्रय येते विनाकारण संकटे येतात.


७ ) ईशान्येला संडास असेल तरी विना तोडफोड उपाय करतो असे सांगून पैसे घेतात अश्या गोष्टीवर ते तोडल्याशिवाय खरोखरच उपाय नाही उगीचच खोटे उपाय करू नका आणी कुणाला हि ईशान्ये ला संडास असताना विनातोड्फोड उपाय करून फरक पडला असल्यास मला नक्की कळवा


८) विनातोड्फोड उपाय वास्तूमध्ये होतच नाही असे नाही पण विनातोड्फोड ६० ते ७० % उपाय नक्कीच होतात.


९) या जागी रोज देवपूजा करावी , दरवाजा असल्यास स्वस्तिक नेहमी लावावे या जागी कलश आवर्जून ठेवा..


१०) इथे नवरा बायकोने झोपणे टाळावेच ,  अडचण असल्यास घरातील वयस्कर व्यक्ती अथवा लहान मुले चालतील



      पूर्व दिशा  East For Health and family harmony 

१) या दिशेला जमिनीचा उतार असल्यास त्या वास्तूमध्ये ऐश्वर्य ,धन व बुद्धी मध्ये वाढ होते 


२) हा भाग उंच असल्यास संततीला धोका असतो धन नाश होतो


 ३) पूर्व जागा जास्तीत जास्त रिकामी असल्यास त्या घरात समृद्धी येते 


४) या दिशेला घराचा दिवाणखाना असावा 


५) मुख्य दरवाजा असावा शोभिवंत कुंड्या असव्यात 


६) या जागी संडास असल्यास रुधय रोग , रक्तविकार , उष्णज्वर,शिरोरोग होतात असे अनुभव आहेत


 ७) या जागी फिक्का गुलाबी, क्रीम, पांढरा , असे रंग असावे.


८) या दिशेला खूप उंच झाडे असू नयेत परंतु शोभिवंत झाडे नक्कीच असावीत.


 ९) या दिशेला कुंपण इतर दिशे पेक्षा कमी उंचीचे असावे.


१०) राजकीय क्षेत्रात लाभ मिळवण्यासाठी पूर्वेच्या मध्यभागी मुख्य दरवाजा असावा.



  आग्नेय दिशा  South East for Wealth 

१) या दिशेला स्वयंपाकघर असणे अत्यंत शुभ व सुखकारक असते.


२) या दिशेला विजेचा मीटर तसेच जनरेटर विचेची मोटार अश्या वस्तू असाव्यात.


 ३) आग्नेय दिशेला विहीर कुपनलिका पाण्याची टाकी असल्यास शत्रूंचा त्रास तसेच अपघात योग दाखवतात.


 ४) या दिशेला वाहनतळ करू शकता.


५) हा कोपरा दुषित असल्यास त्या घरात महिलांना जास्त त्रास होतो. 


६) या दिशेला काही दोष असल्यास कमीत कमी एक लाल रंगाचा दिवा कायमस्वरूपी तिथे लावावा. 


७) या दिशेला दार असल्यास संबधित तज्ञाकडून उपाय करून घ्यावेत अशा वेळी घरात नेहमी मतभेद असतात.


 ८) या दिशेला हलका गुलाबी फिक्कट केसरी रंग देऊ शकता.


९) अग्नेयेचे दार दक्षिणेला असल्यास दीर्घ रोग व कटकटी असतात.


  दक्षिण दिशा  South For Fame And Name 

१) या दिशेला दार अशुभ आहे. या दिशेला दार असल्याने सतत त्रास होतो आजारपण असते.


 २) हि दिशा नेहमी उंच असावी तसेच या दिशेच्या भिंतीही इतर दिशेपेक्षा जाड व उंच असव्यात.


 ३) या दिशेला सांडपाणी अथवा पाण्याची टाकी असल्यास एकामागे एक असे मृतू होतात.


 ४)दक्षिणेच्या दारावर कधीही पंचमुखी मारुती लाऊ नका मासिक धर्मात सर्व स्त्रिया त्याच दाराखालून येतात हे योग्य नव्हे.


 ५) या दिशेला उंच झाडे लावावीत.


 ६) या दिशेला निळा भुरका रंग चालेल.


 ७)या दिशेला संडास बाथरूम असल्यास पती पत्नीमध्ये सतत कलह असतो.


८) दक्षिणेला वरती मजला बांधल्यास शुभ फळ मिळते.


 ९) या दिशेला स्वयंपाकघर असल्यास आर्थिक चणचण असते.


 १०) या दिशेला जिना शुभ फळ देतो.


 ११) या जागी तळघर असल्यास अपमृत्यू होतात.



    नैऋत्य दिशा  South West for Romance luck 


१) हि दिशा घरातील इतर सर्व दिशांमध्ये सर्वात उंच असावी.


 २) या दिशेला घरातील मोठ्यांचे बेड रूम असावे तसेच या दिशेला तिजोरी उत्तरेला तोंड करून ठेवावी.


 ३)या दिशेला जिना चालेल संडास बाथरूम चुकूनही असू नये.


 ४) हि दिशा कट असल्यास अथवा या दिशेला दार असल्यास आत्महत्या होतात अथवा अपघाती मृत्यू होतो.


 ५) या दिशेला गोडाऊन अथवा वाहनतळ चालेल.


 ६) या दिशेला पाण्याची टाकी वास्तूपेक्षा उंचावर असल्यास अति उत्तम


७) जी व्यक ्ती घरात या जागच्या खोलीत राहते त्याचेच प्रभुत्व या घरावर राहते.


 ८) या दिशेचा दरवाजा असल्यास त्वरित बंद करावा.


 ९) या दिशेला संडास पाण्याची टाकी विहीर उतार असल्यास अपकीर्ती बाहेरील बाधा चर्मरोग होतात तसेच संकटांची मालिका चालू राहते असा अनुभव आहे.



      पश्चिम दिशा  West for Creativity and kids luck  

१) या दिशेला नेहमी संडास , बाथरूम असावे.


२) या दिशेला उतार असेल तर त्या घरात स्त्रियांचे प्रभुत्व चालते.


३) हि दिशा उंच असल्यास पुरुषांना कीर्ती मिळते व्यवसाय वृद्धी होते.


४) या दिशेला सेप्टिक टैंक चालेल.


५) प्लॉट मध्ये या दिशेला कमी जागा सोडावी.


६) ईशान्य दिशे पेक्षा जास्त उतार असल्यास दुख भोगावे लागेल.


७) गडद सर्व रंग चालतील.



     वायव्य दिशा  North west for travel luck  and helpful people 


१) या दिशेला नेहमी लहान मुलांचे बेड रूम असावे.


२) या दिशेला वरच्या बाजूला पाण्याची टाकी शुभ . 


३) या दिशेला विहीर कुपनलिका ,जमिनीच्या खालचा पाण्याचा साठा पक्षाघात वेडेपणा कावीळ असे रोग दर्शवतात. 


 ४) या दिशेला जिना शुभ असतो . 


 ५) ज्यांचे विवाह जमत नाही अश्या व्यक्तींनी या दिशेला झोपावे.


६) व्यवसायाच्या जागी या दिशेचा माल लवकर विकला जातो.


 ७) या दिशेला संडास चालेल.



उत्तर दिशा  North for career and luck 

१) साक्षात कुबेराची हि दिशा असून या दिशेला दरवाजा असल्यास अशा वास्तूमध्ये कधीही पैसे कमी पडत नाही 


२) या दिशेला नेहमी उतार असावा…


३) या दिशेला पाण्याचा साठा शुभ.


 ४) या दिशेला कुंपणाची उंची कमी ठेवावी.


५)हि दिशा नेहमी साफ व सुंदर ठेवावी.


६) या दिशेला शोभेची झाडे नक्की लावावी.


७) महत्वाची बोलणी याच दिशेला तोंड करून करावी. 


८) या दिशेला जास्तीत जास्त रिकामी जागा सोडावी. 


९) या दिशेला संडास असल्यास दारिद्र्य येते. 


१०) मुलांनी अभ्यास करताना याच दिशेला तोंड करावे.



काही सोप्या टिप्स Some remedies for prosperity


बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडतात व वसुलीला त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. 

Money should not be lent to anyone on Wednesday, if given, it sinks and recovery is hampered. 

Better to pay on Thursday 

मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी. वा शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. 

The loan should be repaid on Tuesday. The debt repayment situation was improving on Friday.

मंगळवारी पैसे/कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाहीत. 

If you take money / loans on Tuesday, they do not fit quickly

दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्त्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राती होते.

Lakshmi is pleased if the face of Diva or Samai is facing north. If it is in the east, there is happiness.


घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये.

Do not touch the door of the house or shop with your feet.

जो घाणेरडा राहतो, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाते.

He who lives in filth, eats too much, speaks harshly and sleeps at sunrise or sunset, even though he is actually Vishnu, Lakshmi leaves him.

जी व्यक्ती दररोज सकाळी पूर्वेकडे तोंड करून सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा योग करते तिला आयुष्य, आरोग्य, ऎश्वर्य व तेजाची प्राप्ति होते.

A person who does sun salutation, pranayama or yoga facing east every morning attains life, health, prosperity and radiance.

दुध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे.

Add water mixed with milk and sugar to the pimple plant.

उपवासाने - शरीरशुध्दी होते, Fasting - cleanses the body,

व्यायामाने - शरीर बलवान होते, With exercise - the body becomes stronger,

जपाने - मानसिक सामर्थ्य वाढते, Chant - Increases mental strength,

ग्रहांची शांती केल्याने - यश मिळते, Peace of the Planets - Success

धन जतन केल्याने - लक्ष्मी स्थिर राहते, Money comes close to money

रत्न जतन केल्याने - यश मिळते, अनिष्ट दूर होते, gems for  success & bad luck,

दान केल्याने - धन दौलत व राजऐश्वर्य लाभते, Donation brings wealth and prosperity

वास्तुशास्त्रानुरूप घर बांधल्याने - प्रगती होते, Building a house according to Vastushastra makes progress,

रोज योग केल्याने - एकग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. yoga increases concentration, determination and decision making ability.

वरील प्रमाणे सर्व बाबींवर विचार केल्यास व घराचा आराखडा Building Plan तयार करते वेळी  काळजी घेतल्यास फायदा होतो . आमच्या कडे वास्तुशास्त्रानुसार घराची रचना Interior Arrangement कशी करावी याचे खूप प्लान उपलब्ध आहेत . आपण आम्हाला ८४०८९४३९९३ या क्रमांकावर सम्पर्क करू शकता . आमच्या कडे सर्वच दिशांचे घर व घरातील अंतर्गत रचना संदर्भात जसे बैठक व्यवस्था, संडास, बाथरूम , किचन , देवघर , आंगण वास्तुशात्र नुसार नकाशे आहेत . आपल्याला वास्तुशास्त्र नकाशा आम्ही PDF स्वरूपात उपलब्ध करून देऊ शकतो . 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...