मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मराठी लेख लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

भुमी परीक्षण

भुमी परीक्षण  प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर सजवायला व बांधायला आवडत . आपलं घर जगापेक्षा वेगळं हटके असावं असं सुद्धा आपल्यातील बरेच जणांना वाटत . प्लॉट खरेदी करते वेळी वास्तुशास्त्रातील नियम आपल्या घराला लागु होतील का नाही हि भीतीसुद्धा असते. कधीकधी या पुरातन शास्त्राचा सल्ला न घेतासुद्धा बांधकाम केल्या जातात. बांधकाम केल्यावर मग मात्र निसर्गनियमानुसार फळ मिळतात. वास्तुशास्त्रात ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे ती जागा कशी असावी किंवा ती जागा कशी निवडावी याविषयी विस्तृत सखोल माहिती उपलब्ध आहे.  जो भुखंड आपल्याला घर बांधकामासाठी खरेदी करायचा आहे त्याचे भु- परीक्षण वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. वास्तु दोष आढळल्यास घर बांधकाम करायच्या आधी उपाय योजना करावी. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्याना सामोरे जावे लागू शकते.  आनंदी वास्तु तेव्हाच कार्य करते जेव्हा आपले घर वास्तु नियमामध्ये असेल.  भु - परीक्षण कसे करावे ? वास्तुशास्त्र मध्ये अनेक प्राचीन ग्रंथातून याविषयी अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास सांगितला आहे . भूखंडाचा आकार , मातीचा रंग , गंध , स्पर्श , चव यावरून भूमीचे विव...

Vastushastra करावे व करू नये Basic do and don't

Vastu shastra करावे व करू नये  नमस्कार वाचकहो आपण पाहणार आहोत कि , घरामध्ये जर वास्तुशास्त्राचे संपूर्ण फायदे घ्यायचे असल्यास काय करावे व काय करू नये . कष्टाने मेहनतीचे घर बांधलेले असते . त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम एकमेकाला मिळणे . व प्रत्येकाची आर्थिक , सामाजिक प्रगती होणेसाठी वास्तुशात्र गरजेचे असते .              आज आपण अश्याच काही गोष्टी माहित करून घेणार आहोत . या लहान लहान गोष्टीतून आर्थिक भरभराट मात्र नक्कीच होऊ शकते . कधीकधी या सर्व आवश्यक गोष्टी घरात आपल्याला माहित असतात पण आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत नसल्यामुळे मोठ्या वास्तुदोषांना सामोरे जावे लागते . रंग , आकार, दिशा यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातून प्रत्येक वस्तूचा वास्तु शास्त्रामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो . म्हणून भगवत गीतेत श्री भगवान श्रीकृष्ण युक्त आहार विहाराचे महत्व सांगतात . चला तर मग जाणून घेऊया वास्तुटीप्स आणि आपणही आपली प्रगती करूया .  वास्तु उपाय  १) घराचे बाहेर तुळस नक्की लावावी .  २) तुळस समोर शुभ लक्षणांनी युक...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips घर बांधकाम हाती घेते  वेळी नवीन बांधकाम  ( New Construction ) करताना हि काळजी घ्या .  १) सेप्टिक टॅंक उत्तर वायव्य  ( North west North NWN) या दिशेला घ्या .  २) उत्तर दिशेला  WC असू नये .  वायव्य  दिशेला चालेल .  ३) घर बांधकामात पूर्ण गृहपिंड ( Plinth ) चौरस किंवा आयताकृती असावा . plinth ला वेडावाकडा आकार नसावा.  Plinth ला cuts असल्यास बांधकाम करून प्लिंथ पूर्ण करावी .  ४) वास्तु दोष दूर करण्यासाठी  तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे . तोरण प्रशस्त असावे .  ५) आग्नेय  दिशेला चकाकणारी संगमरवरी किंवा शहाबादी फरशी बसवावी . शुभ्र असावी .  ६) नेऋत्य दिशेला पितळेची मूर्ती किंवा भांडे ठेवावे. मूर्ती पोकळ नसावी . भांडे रिकामे ठेऊ नये.  ७) नेऋत्य दिशेचा दोष घालविण्या साठी गोमेद रत्न चिकित्सा करावी. 

What is the true definition of a friend?

मित्र  मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते.  माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.              काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.               मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.        ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi    लिखाणाचे बरेच फायदे आहेत तुमच्या डोक्यात जे काही विचार येतात ते एखादे वेळी त्रासदायक असतात. यातून आरोग्य बिघडू शकते. हे विचार कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असतात. त्यामुळे जर ते काही आपल्या डोक्यात सुरु आहे ते कागदावर लिहून ठेवावे. कागदावर ठेवल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे  मेंदूला हलके वाटायला लागेल. जास्त त्रास जाणवणार  नाही. मी हा उपाय माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खुद्द करून पाहाल  आहे. यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नसते. बस काही पान  घ्या, नेहमीचा पेन घ्या , तुमचे नेहमी चे बसण्याचे ठिकाण चालेल. अगदी गोंधळ गोंगाटाच्या ठिकाणी  असले तरीही चालेल. मी व लोणार सरोवर येथील शिवमंदिर                                                   आता असं समजा की तुमच्या समोर एक तुमच्यापेक्षा लहान मित्र बसला आहे. आणि त्याला तुम्ही काहीतरी आलेला अनुभव सांगत आहे. तुम्ही विचार...

विदिशा Intermediate Compass प्लॉट परिणाम

विदिशा Intermediate Compass प्लॉट परिणाम   विदिशा प्लॉट परिणाम नमस्कार , आज आपण वास्तुशास्त्रानुसार विदिशा प्लॉट चे काय परिणाम होतात त्याबद्दल पाहणार आहोत. विदिशा प्लॉट म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण या दिशेने आपला प्लॉट जर नव्वद अंशाच्या कोणामध्ये नसेल व उपदिशेकडे झुकलेला असेल मुख्य दिशेला घराचे प्रांगण प्रवेश न येत. उपदिशेतून घराचे मुख्य आगमन निर्गमन होत असेल , तर अशा वेळेस त्या प्लॉटला विदिशा भूखंड प्लॉट असे म्हणतात . विदिशा प्लॉट मध्ये ईशान आग्नेय नेऋत्य किंवा वायव्य या दिशेनं मुख्य रस्त्याला सोबत प्लॉटची एक बाजू जोडलेली असते. विविध दिशेनुसार त्याचे वास्तुशास्त्र च्या अभ्यासानुसार वेगवेगळे फळ मिळतात. यामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या उपदिशा आहेत त्यानुसार भूखंड या रस्त्याला जोडलेला असेल त्यानुसार वास्तु मध्ये राहणाऱ्या सदस्यवर काय परिणाम होतात. बऱ्याच विदिशा घरांच्या vastu visit केल्यावर असे आढळून आले आहे की विविध दिशात शुभाशुभ परिणाम वेगवेगळे आहेत. Vidisha Plot ईशान्य North East (Eshanya) - ज्या घराला उत्तर पूर्व दिशेच्या मधून ...

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टक व आरती

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टक व आरती  तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं , मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं , विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः , कुर्यात् सदा मङ्गलं || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना , गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी , ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता , कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो , रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं , शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम , कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। राजा भीमक रुख्मिणीस नयनी , देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा , कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा , त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे , कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे , अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजा...

व्यवसायात यशस्वी होण्या साठी Chanakya Niti- how to success in business

व्यवसायात यशस्वी होण्या साठी  नवीन ओळख झाल्यावर एखाद्याची नीट चौकशी करण्याच्या आधीच आपण आपल्या Idea लोकांना Share करण्या आधीच पैश्याच बोललो तर बर पडते . यातून राग येत नाही. वेळ वाया जात नाही. महत्वाच म्हणजे समोरच्याला आपला concept समजत नाही. काही लोक व्यवसायात अतिशय चिकट व कंजूष असतात.  असे लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याची क्षमता स्वतःजवळ बाळगतात. त्यामुळे अश्या हुशार लोकांना तोंडी जरी तुमच्या व्यावसायिक Idea मिळाल्या  तरी त्यांच्यासाठी फायदा करून देणार असत.       म्हणून कदाचित आचार्य चाणक्य यांनी सांगितलं असेल आपल्या योजना नेहमी गुप्त ठेवा . how to success in business १) आर्थिक नुकसान                 सर्वाना माहीतच आहे कि आचार्य चाणक्य प्राचीन भारतामधील राजकारण व अर्थशास्त्र यामधील प्रसिद्ध विद्वानांमधील एक आहेत. चाणक्य यांनी चार गोष्टी जे नेहमी गुप्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत . आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या वेळी व्यवसायातून व्यापारातून आपल्याला आर्थिक नुकसान अर्थ हानी झाली असेल. तर अशी गोष्...

दुर्गा नवरात्र दुसरा दिवस

दुर्गा नवरात्र दुसरा दिवस  ब्रम्हचारीणी माता                       नवरात्र मधील नऊ दिवसातील विविध नऊ रूपांमध्ये दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी मातेचे पूजन केल्या जाते . ब्रम्हचारीणी मातेची उपासना केल्याने तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या गुणांमध्ये विशेष वाढ होते. ब्रम्हचारीणी मातेच्या कृपेने मानवाला सर्व ठिकाणी विजय व सिद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील समस्या व अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते.                      ब्रम्हचारीणी मातेचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय  आहे. दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रम्हचारीणी हे दुसरे रूप आहे. पहिले रूप शैलपुत्री आहे.  शैलपुत्री मातेचे पूजन नवरात्रात पहिल्या दिवशी घटस्थापने नंतर करतात. ब्रम्हचारीणी म्हणजे  तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या आचरण करणारी. हि देवी सदैव तपा मध्ये शांत व निमग्न होऊन तल्लीन असते. मातेचे मुख तपाच्या सामर्थ्याने तेज व कांतीने झळाळून तिन्ही लोकांमध्ये उठून दिसते.  ...

दुर्गा नवरात्र चवथा दिवस Fourth day Navratra

दुर्गा नवरात्र चवथा दिवस  Fourth day Navratra                             नवरात्रीत नऊ दिवस भाविक भक्त दुर्गा देवीची विविध रूपांमध्ये पूजा अर्चना करतात. यामध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्री Sheilputri , दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी Bramhcharini  , तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा Chandraghanta माता रूपाने पूजन करतात. चवथ्या दिवशी आई कुष्मांडाची Kushmanda  पूजा केली जाते.  मातेने या स्वरूपात जगाची निर्मिती केली आहे . कुष्मांड म्हणजे भोपळा सर्व ब्रह्मांड एक मोठा भोपळा आहे आणि देवीला अर्पण करण्यासाठी विशेष आवड असलेलं फळ भोपळा आहे. माता कुष्मांडा सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. सूर्य या देवीचे निवास स्थान आहे. यामुळेच आई कुष्मांडा देवीच्या मागे सूर्याचे तेज दाखविल्या जाते . माता सिहावर बसली असून आठ हाताची अष्टभुजा आहे.                           नवरात्री मध्ये चवथ्या दिवशी मातेला कुष्मांडा या रूपात पूजन करतात. आईने आपल्या स्मित ...

दुर्गा नवरात्र तिसरा दिवस Navratri Third Day

दुर्गा नवरात्र तिसरा दिवस Navratri Third Day चंद्रघंटा माता Chandraghanta Mata       नवरात्री   मध्ये नऊ दिवस भाविक भक्त विविध नऊ रूपांमध्ये देवीची उपासना करतात . तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा  Chandraghanta Mata  पूजन केल्या जाते. दुर्गा देवीचे हे स्वरूप भक्तांना शांतीदायक व कल्याणकारक आहे . मातेच्या कपाळावर अर्ध चंद्र सुशोभित आहे. चंद्रघंटा मातेला १० हात असून आठ ८ हातात विविध आयुधे आहेत. व शेवटच्या डाव्या व उजव्या हाताने माता भक्तांना आशीर्वाद देत आहे. देवीचा सुवर्ण रंग आहे . पिवळा रंगाची आभा आहे.         चंद्रघंटा देवीला स्वरांची देवी समजण्यात येते. चंद्रघंटा   मातेला सुवर्ण सम पीत वर्णाची आहे. देवीला तीन डोळे व दहा हात आहेत. आईच्या हातात गदा , बाण, त्रिशूल, धनुष्य, खडग, खापर, चक्र  आणि इतरही अस्त्र शस्त्र आहेत. चंद्रघंटा माता अग्नी सारखी वर्णाची , ज्ञान व गुणांनी परिपूर्ण आहे. देवी सिंह सवारी करीत असून युद्धाची मुद्रा आहे.                 चंद्रघंटा मातेचे हे...