Vastu shastra करावे व करू नये
नमस्कार वाचकहो आपण पाहणार आहोत कि , घरामध्ये जर वास्तुशास्त्राचे संपूर्ण फायदे घ्यायचे असल्यास काय करावे व काय करू नये . कष्टाने मेहनतीचे घर बांधलेले असते . त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम एकमेकाला मिळणे . व प्रत्येकाची आर्थिक , सामाजिक प्रगती होणेसाठी वास्तुशात्र गरजेचे असते .
आज आपण अश्याच काही गोष्टी माहित करून घेणार आहोत . या लहान लहान गोष्टीतून आर्थिक भरभराट मात्र नक्कीच होऊ शकते . कधीकधी या सर्व आवश्यक गोष्टी घरात आपल्याला माहित असतात पण आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत नसल्यामुळे मोठ्या वास्तुदोषांना सामोरे जावे लागते . रंग , आकार, दिशा यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातून प्रत्येक वस्तूचा वास्तु शास्त्रामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो . म्हणून भगवत गीतेत श्री भगवान श्रीकृष्ण युक्त आहार विहाराचे महत्व सांगतात . चला तर मग जाणून घेऊया वास्तुटीप्स आणि आपणही आपली प्रगती करूया .
वास्तु उपाय
१) घराचे बाहेर तुळस नक्की लावावी .
२) तुळस समोर शुभ लक्षणांनी युक्त रांगोळी नक्की घालावी .
३) आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार समोरील घराच्या दार समोर असू नये . म्हणजेच आपल्या दारा समोर दुसरे दार नको .
४)दरवाजे व खिडक्या ( doors & windows ) घराला लावतांना अश्या प्रकारे लावाव्या कि , खालच्या मजल्यावर जितके दरवाजे असतील त्यापेक्षा वरील मजल्यावर कमी असावे . जसे जसे वरच्या मजल्यावर जाणार तसे तसे दरवाजे व खिडक्यांची संख्या कमी असावी .
५) मेन दरवाज्याला देवता टाईल्स लावावी व दरवाजा तोरणांनी नेहमी सजलेला ठेवावा .
६) आपल्या घरातील ईशान्य दिशेचा भाग नेहमी स्वच्छ ठेवावा . तिथे भंगार किंवा जड कुंडी ठेऊ नये .
७) शक्य असल्यास घर बांधकाम करते वेळीच घराच्या मुख्य दरवाज्यावर दुसऱ्या घराची सावली पडणार नाही याची काळजी घ्यावी .
८) घर बांधकाम करते वेळी चांगल्या वास्तु सल्लागार vastu consultant कडून नकाशा तपासून घ्यावा .
९) वास्तु consultant ला वर्षातून एकदा तरी आपले वास्तु परीक्षण करायला बोलवावे .
१०) बांधकाम करते वेळी लक्षात घ्यावे कि दक्षिण पश्चिम दिशेला जास्त बांधकाम घ्यावे .
११) ईशान्य दिशेस वरच्या मजल्यावर जास्त बांधकाम घेऊ नये .
आपल्या वास्तु शंकाचे निरसरण करणे साठी आपण संपर्क करू शकता .
०८४०८९४३९९३ या क्रमांकावर .