मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi  

 लिखाणाचे बरेच फायदे आहेत तुमच्या डोक्यात जे काही विचार येतात ते एखादे वेळी त्रासदायक असतात. यातून आरोग्य बिघडू शकते. हे विचार कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असतात. त्यामुळे जर ते काही आपल्या डोक्यात सुरु आहे ते कागदावर लिहून ठेवावे. कागदावर ठेवल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे  मेंदूला हलके वाटायला लागेल. जास्त त्रास जाणवणार  नाही. मी हा उपाय माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खुद्द करून पाहाल  आहे. यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नसते. बस काही पान  घ्या, नेहमीचा पेन घ्या , तुमचे नेहमी चे बसण्याचे ठिकाण चालेल. अगदी गोंधळ गोंगाटाच्या ठिकाणी  असले तरीही चालेल.
Vastu shastra Nitin Patil Markale
मी व लोणार सरोवर येथील शिवमंदिर  




                                                आता असं समजा की तुमच्या समोर एक तुमच्यापेक्षा लहान मित्र बसला आहे. आणि त्याला तुम्ही काहीतरी आलेला अनुभव सांगत आहे. तुम्ही विचार कराल की लहानच मित्र का समवयस्कर किंवा मोठा का नाही. त्याचे उत्तर मी असे देतो की, समजतो काल्पनिक मित्र समवयस्कर समजलो. तर आपण शाळेत असल्यासारखे एकदम मोकळे बोलू. कदाचित शिव्यांचा शब्दसंग्रह रिकामा होऊ शकतो. आणि ते एक आदर्श विचार असले तरी आदर्श लेखन होणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या वयापेक्षा आपला मित्र मोठा आहे असं जर आपण कल्पना केली. तरी त्याला आपण आपल्याला आलेले अनुभव व्यक्त करू शकणार नाही. त्यापेक्षा लहान बघा. लहान आहे म्हणून आपण आपले प्रामाणिकपणे विचार बोल त्याला आवर्जून सांगू टाकू.

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi 


                                             तर कागदावर व्यक्त होण्यासाठी एक कागद व पेन लागेल. जागा लागेल व त्यानंतर थोडा वेळ लागेल. आता तुम्ही विचार कराल थोड्यावेळ कशासाठी तर विचार आहे आपल्या मेंदूची एक   क्रिया आहे.  ही क्रिया पूर्ण होण्यासाठी मेंदूला खाद्य रूपाने खूप सगळ्या स्मृती पुरविण्यात येतात त्यावर प्रक्रिया करून मेंदू आपल्यासाठी विचार तयार करतो. एखाद्या बोलक्या व्यक्तीचे विचार हे असेच त्याच्या मेंदूतून बाहेर पडत असतात. जग अशा लोकांना फक्त बडबड व्यक्ती म्हणून पाहून सोडून देतो. याउलट जर हेच विचार कागदावर लिहून ठेवल्यास खूप फायद्याचे होतात. आपले विचार व्यक्त करायला शिका. म्हणजेच विचार डोक्यात सुरू आहे त्याला ताबडतोब अमलात नाही आणता आले तरी चालेल. पण लिहून मात्र नक्की ठेवावा भारतातील प्रसिद्ध उद्योगपती स्वर्गीय धीरूभाई अंबानी म्हणतात "विचार करा व लवकर करा लवकर विचार करा कारण तुमच्या डोक्यात सुचणारे विचार तुमचे  गुलाम नाहीत."
सांगायची गोष्ट हीच की जो विचार आला तुम्हाला आला असेल तसा विचार जगातील सर्वच मेंदूत येऊ शकतो. त्यामुळे त्याला महत्व द्या. तुम्ही म्हणाल त्यात काय मोठं काम आहे. आमच्या डोक्यात खूप सुंदर विचार असतात ते डोक्यात ठीक आहेत  कागदावर कशाला????  मान्य आहे की आपले विचार शुल्लक आहेत पण त्यामुळे मन मोकळं होत असेल तर लिहायला काय हरकत आहे सांगा???  जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या शब्दांना इतके महत्त्व दिले आहे की त्यांना  धनाची उपमा दिली आहे.

                                                         " आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने"
 प्रत्येकाला चांगले विचार नेहमीच राहतात. आणि जेव्हा ते विचार येतात तेव्हा तो सर्वात जवळ उभा असलेल्या व्यक्ती असेल त्याचे जवळ बोलून आपण मोकळे होतो. ऐकण्याचा व्यक्ती तुमच्या विचारांना गंभीरतेने घेणारा नसेल, तर तुमच्या मेंदूतून प्रक्रिया पूर्ण झालेले विचार वाया जातात. त्यामुळे एखाद्या समोर खूप चांगली व्यक्त होऊनही विचार नष्ट होण्याची भीती असते. त्यापेक्षा लिहून ठेवले ते बरे. बर यातून लिहीत असताना तुम्हाला कोणीच मध्ये रोखत  नाही . कधीकधी आपण पाहतो  की एखादे चर्चेत आपण आपले विचार मांडलेले असतात. आणि मध्येच एखादा सदस्य त्याचे विचार आपल्या प्रभावी शारीरिक हावभावांची अभिनय करून आपल्या समोर ठेवतो. आणि आपण बोलायचं विसरुन समोरच्याचं ऐकत राहतो. ऐकता ऐकता त्याच्या प्रत्येक वाक्याला हो हो बरोबर आहे अशी दाद सुद्धा देत राहतो. अशा वेळी त्या चर्चेच्या ठिकाणी स्वतःच  स्वतःला सावध करायला शिका. दोघांनाही देवाने डोके दिलेली आहेत.
                                                           
                                                       श्रोता आणि वक्त्या मधील फरक इतकाच की वक्ता जास्त लवकर प्रक्रिया पूर्ण करून विचार अभिनयातून आपल्यासमोर मांडतो. तर आपले शब्द ऐकून मेंदूत साठवत असतो. मग या पूर्ण प्रक्रियेला समजून घेतल्यास लक्षात येते की, आपल्याला वक्त्याचे जे विचार मिळतात तेच विचार आपले धन असते. त्यांना व्यर्थ वाया घालवायचे नसते. नाहीतर " नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेली वारे " अशी गत होणार. म्हणजेच वाक्याला गंभीरतेने ऐकणे तेवढेच गरजेचे असते जेव्हा तुम्ही कोणाला काही तुमचे विचार सांगता तेव्हा ते तुमचे नसतातच मुळी, फक्त ते तुम्ही मेंदूत प्रक्रिया करून दुसरा समोर मांडत असता.
                                                                तुकाराम महाराज शब्दांना रत्न म्हणतात.  तसेच शब्द हे प्रेरणादायी असतात.  सैनिक जेव्हा शत्रूवर हल्ला करतात तेव्हा " हर हर महादेव"  गर्जना करतात. तेव्हा गर्जना करतेवेळी निघालेले शब्द त्यांचेसाठी ऊर्जा देणारे असतात. विचार आहे शब्दात प्रगट होतात व शब्द हे ऊर्जेत रूपांतरित होतात. म्हणून आपण सुद्धा असे शब्द सामर्थ ठेवू शकतो  जे श्रोत्यांसाठी ऊर्जा देणारे असेल. अशावेळी आपल्या समोर बसलेला   श्रोता  जर आपल्या विचारण सोबत तादाम्य  पावला एकरूप झाला तर वक्त्यांची  ऊर्जा जणू त्याला प्राप्त होते.  त्यामुळेच आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून  दृक  श्राव्य   माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून तरुणांना आपले विचार काही मंडळी नेहमी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतात. जे विचार नेहमी ऐकल्या जातात ते मेंदू कायम  कोरल्या जातात .

                                              जेव्हा व्यक्तीला निर्णय घ्यायचा असतो तेव्हा हेच विचार ऐकलेले मेंदू प्रक्रिया करून त्याचे  समोर प्रगट करतो. त्यामुळे चांगले विचार ग्रहण करणे सुद्धा गरजेचे आहे चांगले विचार ग्रहण करण्याचे साधन बरेच आहेत यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे, ऐकायची सवय ठेवणे. वाचनाची आवड असणे. सामाजिक उपक्रमात सहभाग असणे. मित्र जोडत राहणे. सतत उद्योगी राहणे. चांगल्या ठिकाणी जाऊन जे नवीन असेल त्याचा अभ्यास करून आकलन करणे.
मानवाचा जन्म खूप भाग्याने लाभतो , त्यामुळे मानवाने आपल्या वेळेचा उपयोग जास्तीत जास्त ज्ञान अभ्यास करण्यासाठी खर्ची घालावा .                                   चाणक्य निती 



हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कंमेंट मध्ये नक्की सांगा.
वास्तुशास्त्र बद्दल काही प्रश्न असतील तर ते  पण आपण विचारू शकता .

      धन्यवाद
लेखक - नितीन अशोकराव मरकाळे  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...