घर बांधकामाच्या वास्तु टिप्स Vastu shastra Tips For Building Construction
![]() |
Proposed Construction As Per Vastu |
नमस्कार मित्रांनो,
जर आपण नवीन घर बांधकाम Construction करत असाल किंवा नवीन घर विकत Purchase घेत असाल.
तर अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा वास्तुशास्त्राच्या काही ज्या टिप्स आहेत .
त्या मी तुम्हाला आज सांगत आहे.
Vastu shastra Tips For Construction
- त्यातील पहिली गोष्ट अशी की, जर आपण राहण्यासाठी म्हणजेच Residential किंवा व्यावसायिक हेतूने म्हणजेच Commercial कमर्शियल बिल्डिंग यासाठी जमीन घेत असाल त्या जमीन किंवा भूखंड हा वास्तुशास्त्राचे सिद्धांत भू परीक्षणासाठी आहेत त्यानुसार असणे आवश्यक आहे.
- जर आपण तयार असलेले घर किंवा एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकान घेत असू अशावेळी त्या भूखंडाची संबंधित व झालेल्या बांधकाम शी संबंधित वास्तु नियम पाळले गेलेत की नाही हे पाहूनच खरेदी करावी.
- जर आपण रिकामा प्लॉट घेतो अशावेळी सर्वप्रथम त्या जागेत असलेले शल्य म्हणजेच नकारात्मक ऊर्जेने भरलेल्या वस्तू यांचं शोधन करणे आवश्यक आहे. सोबतच प्लॉटला लागून असलेले रस्ते व प्लॉटच्या बाहेर असलेले दोष यांचा पण विचार करणे आवश्यक आहे.
- आता एखादा प्लॉट आपल्याला आवडला असेल आणि शल्य शोधून , समोरील रस्त्यांचा दवार वेध विचार प्लॉटच्या बाहेरील दोष याबद्दल पण आपण सर्व विचार केला असेल, अशा वेळेस एखाद्या चांगल्या शुभमुहूर्तावर भूमी किंवा प्लॉट याची रजिस्टर करावी, सीमांकन Demarcation करावे चांगल्या वास्तुतज्ञ कडून ज्यांना वास्तुशास्त्र बद्दल माहिती आहे, अशा पासून आपल्या स्वप्नातील घरांचा नकाशा तयार करून घ्यावा.
- घराचा नकाशा तयार झाल्यानंतर सर्वात आधी प्लॉटवरील शल्य दोष नाहीसा करावा त्यानंतर क्रमाक्रमाने जमीन समतल करावी.
- वास्तु तज्ञांनी दिलेल्या नकाशा ला सोबत घेऊन विद्वान ज्योतिष किंवा गुरुजी यांच्याकडून पायाभरणी व बांधकामाचा मुहूर्त पहावा.
- जो नकाशा मान्य केला असेल तो याप्रकारे असावा की त्या घराच्या चारी बाजूला कमीत कमी दहा टक्के जागा site margin ही मोकळी सोडलेली असावी. घर बांधकाम परवानगी घ्यावी . विविध प्राधिकरणांनी Sectioning authority नेमून दिलेल्या नियमांचे पालन करावे .
- घराचे बांधकाम नैऋत्य दिशेत जास्त व ईशान्य दिशेत कमी असावे. म्हणजेच घराच्या सर्व भिंती ह्या पश्चिम किंवा दक्षिण इकडे जास्त बांधकामाच्या असाव्यात.
- जर आपल्याला घर क्रमाक्रमाने बांधायचे असेल तर वास्तुशास्त्र मध्ये घर बांधकामाचा निश्चित केला गेला आहे. त्याप्रमाणे सर्वप्रथम अग्नी दिशेपासून घर बांधकामाला सुरुवात करावी व क्रमाक्रमाने आग्नेय, दक्षिण, नेऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर , पूर्व दिशेला बांधकाम करत यावे.
- जर बांधकाम एक मजली , दोन मजली असेल अशावेळी दक्षिण-पश्चिम भिंतीला जास्त बांधकाम घेऊन त्याची क्रमाक्रमाने पूर्व व उत्तर दिशेला घराची उंची कमी असावी.
- वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम करतेवेळी अंगण हे पूर्व किंवा उत्तर दिशेला जास्त अनुकूल राहते. त्याचप्रमाणे नोकरांसाठी खोल्या, पोटमाळे, Loft पाण्याच्या मोठ्या टाक्या ह्या पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर किंवा दिशेला घ्याव्या.
- वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम करतेवेळी दक्षिण-पश्चिम च्या तुलनेत उत्तर दिशेला व पूर्व दिशेला दरवाजे आणि खिडक्या जास्त ठेवाव्या त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा Positive Energy प्रवाह वाहतो नेहमी दरवाजे आणि खिडक्या ह्या समसंख्या असाव्या.
- दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या भिंती ह्या नेहमी बाकी भिंती पेक्षा जास्त रुंद व मजबूत असाव्यात.
- घराच्या मुख्य दरवाजावर मंगल चिन्ह अंकित करावे दुर्गा मातेची मूर्ती , कलश, स्वस्तिक, ओम, शिव , गणेश अशा मंगल चिन्हांचा उपयोग करावा.
- खुल्या प्लॉटवर घराचे बांधकाम करतेवेळी वास्तुशास्त्रानुसार उत्तर किंवा पूर्व दिशेच्या रस्त्यांचा उपयोग करावा व घराचे मुख्य दार हे उत्तर किंवा पूर्व दिशेच्या रस्त्यावरच लागून येईल याची काळजी घ्यावी.
- घराचा मुख्य दरवाजा Main Door व घराचे मुख्य गेट Main Gate एकाच दिशेला असावे .

Good Vastu Tipe Construction
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवाmast mahiti
उत्तर द्याहटवाThis post is extremely radiant. I extremely like this post. It is outstanding amongst other posts that I’ve read in quite a while. Much obliged for this better than average post. I truly value it! vastu shastra
उत्तर द्याहटवाI’ve been surfing on the web more than 2 hours today, yet I never found any stunning article like yours. It’s alluringly worth for me. As I would see it, if all web proprietors and bloggers made puzzling substance as you did, the net will be in a general sense more beneficial than at whatever point in late memory. Check this website Also, www.provastu.com
उत्तर द्याहटवा