विदिशा Intermediate Compass प्लॉट परिणाम
विदिशा प्लॉट परिणाम
नमस्कार ,
आज आपण वास्तुशास्त्रानुसार विदिशा प्लॉट चे काय परिणाम होतात त्याबद्दल पाहणार आहोत. विदिशा प्लॉट म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण या दिशेने आपला प्लॉट जर नव्वद अंशाच्या कोणामध्ये नसेल व उपदिशेकडे झुकलेला असेल मुख्य दिशेला घराचे प्रांगण प्रवेश न येत. उपदिशेतून घराचे मुख्य आगमन निर्गमन होत असेल , तर अशा वेळेस त्या प्लॉटला विदिशा भूखंड प्लॉट असे म्हणतात . विदिशा प्लॉट मध्ये ईशान आग्नेय नेऋत्य किंवा वायव्य या दिशेनं मुख्य रस्त्याला सोबत प्लॉटची एक बाजू जोडलेली असते. विविध दिशेनुसार त्याचे वास्तुशास्त्र च्या अभ्यासानुसार वेगवेगळे फळ मिळतात. यामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या उपदिशा आहेत त्यानुसार भूखंड या रस्त्याला जोडलेला असेल त्यानुसार वास्तु मध्ये राहणाऱ्या सदस्यवर काय परिणाम होतात. बऱ्याच विदिशा घरांच्या vastu visit केल्यावर असे आढळून आले आहे की विविध दिशात शुभाशुभ परिणाम वेगवेगळे आहेत.
![]() |
| Vidisha Plot |
ईशान्य North East (Eshanya) -
ज्या घराला उत्तर पूर्व दिशेच्या मधून मार्ग जातो . म्हणजेच ईशान्य दिशेला रास्ता असलेल्या घराला सर्व शुभ परिणाम दिसून येतात अशी वस्तू अत्यंत शुभ समजल्या जाते. धन , धान्य,आरोग्याची कमतरता राहत नाही .
आग्नेय South east ( Agneya) -
ज्या घराला किंवा भूखंडाला अग्नि दिशे मधून मारला जातो किंवा झोप लोट आग्नेय कोणामध्ये रस्त्या सोबत जोडलेला असतो तू प्लॉट वास्तुशास्त्रानुसार शुभ नाही अशा घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांमध्ये नेहमी कलह होण्याची शक्यता असते, तसेच अशा घरांमध्ये परस्पर स्नेह संबंधांचा अभाव आढळून येतो.
जर विदिशा प्लॉट वर घर बांधकाम केले असता वरील प्रमाणे परिणाम वास्तू शास्त्रानुसार आढळून येतात .
जर आपणाला घरातील वास्तुदोषाबद्दल काही प्रश्न असल्यास संपर्क करावा. किंवा आपले प्रश्न संक्षिप्त स्वरूपात कंमेंट बॉक्स मध्ये विचारावे. आमच्या कडून आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळेल.
नैऋत्य South west (Nerutya) -
ज्या घराच्या दक्षिण पश्चिम कोनातून रस्ता जातो किंवा जे घर नैऋत्य दिशेला असलेल्या रस्त्यावर बांधलेले असते. असे घर वास्तुशास्त्राप्रमाणे शुभ सांगितलेले नाही . अशा घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांमध्ये नेहमी शांतीचा अभाव दिसून येतो. तसेच या घरात राहणारे सदस्य नेहमी विविध आजारांनी ग्रस्त आढळून येतात.वायव्य North West ( Vayavya) -
आता आपण वायव्य कोनातून रस्ता असलेल्या घराबद्दल पाहुयात. जे घर वायव्य दिशेला असलेल्या मार्गावर बांधलेले असते असे घर वास्तुशास्त्रानुसार शुभ समजले जात नाही. अशा घरांमध्ये राहणारे सदस्य या ना त्या कारणाने त्या घरात एकत्र राहत नाही . अशा घरांमध्ये वर सांगितल्याप्रमाणे आग्नेय, नैऋत्य दिशेशी संबंधित दोष जरी आढळून येत नसले , तरीही या घरात किंवा अशा घरात राहणारे व्यक्ती वायव्य दिशेस राहत असल्यामुळे चंचल स्वभावाच्या असतात. त्यामुळे वायव्य दिशेने ला राहणाऱ्या घरांमध्ये राहणाऱ्या सदस्यांना Stability स्थिरता लाभत नाही .जर विदिशा प्लॉट वर घर बांधकाम केले असता वरील प्रमाणे परिणाम वास्तू शास्त्रानुसार आढळून येतात .
जर आपणाला घरातील वास्तुदोषाबद्दल काही प्रश्न असल्यास संपर्क करावा. किंवा आपले प्रश्न संक्षिप्त स्वरूपात कंमेंट बॉक्स मध्ये विचारावे. आमच्या कडून आपल्याला लवकरात लवकर उत्तर मिळेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा