व्यवसायात यशस्वी होण्या साठी
नवीन ओळख झाल्यावर एखाद्याची नीट चौकशी करण्याच्या आधीच आपण आपल्या Idea लोकांना Share करण्या आधीच पैश्याच बोललो तर बर पडते . यातून राग येत नाही. वेळ वाया जात नाही. महत्वाच म्हणजे समोरच्याला आपला concept समजत नाही. काही लोक व्यवसायात अतिशय चिकट व कंजूष असतात.
असे लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याची क्षमता स्वतःजवळ बाळगतात.त्यामुळे अश्या हुशार लोकांना तोंडी जरी तुमच्या व्यावसायिक Idea मिळाल्या तरी त्यांच्यासाठी फायदा करून देणार असत.
म्हणून कदाचित आचार्य चाणक्य यांनी सांगितलं असेल आपल्या योजना नेहमी गुप्त ठेवा .
how to success in business
१) आर्थिक नुकसान
सर्वाना माहीतच आहे कि आचार्य चाणक्य प्राचीन भारतामधील राजकारण व अर्थशास्त्र यामधीलप्रसिद्ध विद्वानांमधील एक आहेत. चाणक्य यांनी चार गोष्टी जे नेहमी गुप्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत .
आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या वेळी व्यवसायातून व्यापारातून आपल्याला आर्थिक नुकसान अर्थ हानी झाली असेल. तर अशी गोष्ट तुम्ही कोणासोबतच Share करू नका . यातून आपले झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार नाही उलट झालेल्या गोष्टीवरून समोरचा तुम्हाला मान प्रतिष्ठा देणार नाही . समोरचा व्यक्ती कितीही जवळचा असला तरी तुमच्या पासून लांब जाऊ शकतो . त्यामुळे हि गोष्ट गुप्त ठेवावी असे आचार्य सांगतात .
२) मानसिक वेदना
जर तुम्हाला एखादया गोष्टीमुळे मानसिक वेदना झाल्या असतील तर अशी गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना सांगू नका. कारण सर्वच लोक चांगल्या मनाची नसतात . यातून ती व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे मनातील दुःख कोणापुढे सांगू नका. मनाने खंबीर असलेले लोकच जग जिंकतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा भावनिक होऊन चालत नाही. ज्यांना तुम्ही स्वतःच्या मनातील वेदना सांगता ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करू शकते. यातून शेवटी आपल्याला जास्तच दुःख होणार.३) घरातील खाजगी गोष्टी
कधीकधी आपण आपल्या मित्र परिवार नातेवाईक किंवा शेजारी यांच्या सोबत घरातील काही खाजगी बाबी व्यक्त करतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे कि कुटुंबातील खाजगी बाबी बाहेर कोणालाही समजू देऊ नका. त्या पूर्ण पणे गुप्त ठेवा. विशेषता life partner पत्नी बदल काहीही सांगू नका . असे केल्यास तुमच्या व्यक्तिमत्वाला मान प्रतिष्ठेला धक्का लागतो . भविष्यात बऱ्याच गोष्टी यावर अवलंबून असतात. so त्यामुळे घरातील प्रायव्हेट गोष्टी बाहेर सांगू नका .४) झालेला अपमान
आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञानी मनुष्य तो असतो. जो मान अपमान सारखाच समजतो . त्यामुळे जर तुमचा कुठे अपमान झाला असेल तर ते कृपया गुप्तच ठेवा. झालेला अपमान पचवा . जर तुम्ही तुमच्या झालेल्या अपमानाची कुठे दुसरीकडे चर्च्या केली तर तुमच्या अपमाणात आणखी वाढ होते. काही व्यक्ती असे असतात जे झालेली गोष्ट दिवसभर सगळ्यांना सांगत सुटतात . त्यातून काहीच मिळत नाही उलट भविष्यात यापासून त्रास आणखी जास्त वाढतो.म्हणूनच माझ्या वाचकांना नम्र विनंती आहे कि आपणही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ह्या चार गोष्टी कायम स्वतःजवळ ठेवा. म्हणजे गुप्त ठेवा .
१) आर्थिक नुकसान
२) मानसिक वेदना
३) घरातील खाजगी गोष्टी
४) झालेला अपमान
व्यवसायात व्यापारात उन्नती करण्यासाठी या गोष्टी कायम ठेवा .धन्यवाद
![]() |
| Add caption |

I think the author has done lots of hard work to this wonderful post.
उत्तर द्याहटवाThank You Author.
Relates: https://www.businessinsane.com/2019/10/chanakya-niti-for-business-strategy.html
Business Insane - "READ THE SUCCESS"