दुर्गा नवरात्र चवथा दिवस Fourth day Navratra
नवरात्रीत नऊ दिवस भाविक भक्त दुर्गा देवीची विविध रूपांमध्ये पूजा अर्चना करतात. यामध्ये पहिल्या दिवशी माता शैलपुत्री Sheilputri , दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी Bramhcharini , तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा Chandraghanta माता रूपाने पूजन करतात. चवथ्या दिवशी आई कुष्मांडाची Kushmanda पूजा केली जाते. मातेने या स्वरूपात जगाची निर्मिती केली आहे . कुष्मांड म्हणजे भोपळा सर्व ब्रह्मांड एक मोठा भोपळा आहे आणि देवीला अर्पण करण्यासाठी विशेष आवड असलेलं फळ भोपळा आहे. माता कुष्मांडा सर्व दुःखाचा नाश करणारी आहे. सूर्य या देवीचे निवास स्थान आहे. यामुळेच आई कुष्मांडा देवीच्या मागे सूर्याचे तेज दाखविल्या जाते . माता सिहावर बसली असून आठ हाताची अष्टभुजा आहे.
नवरात्री मध्ये चवथ्या दिवशी मातेला कुष्मांडा या रूपात पूजन करतात. आईने आपल्या स्मित व हलक्या शांत हास्याने या संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती केली आहे. यामुळेच देवीला आदीशक्ती आदीस्वरूपा असेही म्हणतात.
या देवीला आठ हात आहेत . त्यामुळे अष्टभुजा असेही म्हणतात . कुष्मांडा मातेच्या सात हातात कमण्डल , धनुष्य , बाण , कमळ फुल , अमृत घट , चक्र व गदा आहे. आठव्या हातात सर्व सिद्धी व निधी देणारी जपमाळ आहे.
मनाने स्थिर व पवित्र होऊन दुर्गा नवरात्री मध्ये देवीची पूजा आराधना करावी . यामुळे भक्तांच्या रोग व दुःखाचा नाश होतो. व आयुष्य यश , बल , आरोग्य प्राप्त होते. माता थोड्याश्या सेवेने व भक्तीने प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. चांगल्या मनाने देवी पूजन केल्यास परम पद प्राप्त करता येते.
कुष्मांडा मातेला भोपळा विशेष आवडणारे फळ आहे . साधना करतांना याची बळी देवीला जरूर दयावी भोपळा पासून तयार केलेला पेठा अर्पण करावा व त्याचाच प्रसाद करावा . दुर्गा देवीच्या या रूपातील मंदिर भारतात माँ कुष्मांडा देवी मंदिर , पिपरा माफ , महोबा , उत्तर प्रदेश इथे आहे .
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला कडून सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेछया !!!!

मंत्र
सुरासम्पूर्णकलशं
रुधिराप्लुतमेव च ।
दधाना हस्तपद्माभ्यां कूष्माण्डा शुभदास्तु
मे ॥
या देवी सर्वभूतेषु माँ
कूष्माण्डा रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नम:।।
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला कडून सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेछया !!!!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा