अपार्टमेंट फ्लॅट साठी वास्तुशास्त्र
आज लोकसंख्येच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रत्येकाला आपले घर व्हावे असे वाटत असले तरी शक्य होत नाही . या प्रचंड स्पर्धेच्या युगात मानवाला राहायला घर मिळणे मोठी गोष्ट झाली आहे . प्रत्येकाला जमिनीवरील प्लॉट मिळेलच असे नाही . यासाठी अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेण्याचे प्रमाण वाढले आहे . यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती अनुरूप , बांधकाम व्यावसायिक देत असलेल्या सोई सुविधा ने युक्त फ्लॅट घेतल्या जात आहेत . जर एक अपार्टमेंट म्हणजेच एक घर असेल तर त्या घरातील प्रत्येकच रूम वास्तुशास्त्रानुसार असेलच असे नाही . त्यामुळे आपण असे म्हणू शकतो कि फ्लॅट मध्ये पूर्णतः शास्त्रानुसार वास्तू पाहणे शक्य नाही . तरी पण बऱ्याच प्रमाणात पाहता येणे शक्य आहे . कोणताही फ्लॅट विकत घेण्या अगोदर आपण तो वास्तू सम्मत आहे कि नाही हे वास्तु परीक्षण करून पाहू शकतो . जर आपल्याला पाहिजे असलेल्या ६० ते ७० टक्के वास्तु नियम त्यामध्ये पूर्ण होत असल्यास व्यवहार करायला काही अडचण येत नाही .
फ्लॅट विकत घेतांना
जर मुख्य दरवाजा कोणत्याही अशुभ दिशा स्थानावर उघडत असेल तर असा दरवाजा नेहमी शक्यतोवर बंदच ठेवावा . जेव्हा काम असेल तेव्हाच याचा उपयोग करावा . या दरवाज्याच्या भिंतीवर विघ्णहर्ता गणेशाची प्रतिमा किंवा लहान मूर्ती अवश्य लावावी , जेणे करून येणाऱ्या व्यक्तीला सर्वप्रथम घरात प्रवेश करते वेळी गणेश दर्शन घडेल .
शक्यतोवर नेऋत्य व आग्नेय दिशेला स्नानागार असलेले फ्लॅट विकत घेण्याचे टाळावे . जर विकत घेतला असेल तर , अश्या बाथरूम मध्ये पाण्याचा संग्रह साठवणूक करू नये . ईशान्य दिशेला गंगाजल भरून ठेवावे यामुळे नेऋत्य दिशेतील बाथरूम चा वास्तुदोष कमी होतो . आग्नेय दिशेस जर स्नानागार असेल तर एक लाल रंगाचा दिवा बल्ब आग्नेय दिशेस नेहमी सुरु ठेवावा . स्नान करते वेळी पूर्व दिशेकडे तोंड करावे .
https://local.google.com/place?id=11043182856705373027&use=posts&lpsid=240158444902957923
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा हि विनंती .
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला ०८४०८९४३९९३
https://local.google.com/place?id=11043182856705373027&use=posts&lpsid=240158444902957923
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा हि विनंती .
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला ०८४०८९४३९९३
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा