मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

दुर्गा नवरात्र दुसरा दिवस


दुर्गा नवरात्र दुसरा दिवस 

ब्रम्हचारीणी माता 



                     नवरात्र मधील नऊ दिवसातील विविध नऊ रूपांमध्ये दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी मातेचे पूजन केल्या जाते . ब्रम्हचारीणी मातेची उपासना केल्याने तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या गुणांमध्ये विशेष वाढ होते. ब्रम्हचारीणी मातेच्या कृपेने मानवाला सर्व ठिकाणी विजय व सिद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील समस्या व अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते. 
                    ब्रम्हचारीणी मातेचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय  आहे. दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रम्हचारीणी हे दुसरे रूप आहे. पहिले रूप शैलपुत्री आहे. शैलपुत्री मातेचे पूजन नवरात्रात पहिल्या दिवशी घटस्थापने नंतर करतात. ब्रम्हचारीणी म्हणजे तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या आचरण करणारी. हि देवी सदैव तपा मध्ये शांत व निमग्न होऊन तल्लीन असते. मातेचे मुख तपाच्या सामर्थ्याने तेज व कांतीने झळाळून तिन्ही लोकांमध्ये उठून दिसते. 
                         ब्रम्हचारीणी मातेच्या उजव्या हातात माळ आहे व डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. माता ब्रह्मचारिणी साक्षात ब्रम्हरूप म्हणजेच तपशेची मूर्ती आहे. यामुळे या देवीचे आणखी नाव सुद्धा आहेत. तपचारिणी, अपर्णा व उमा या नावाने सुद्धा मातेला ओळखले जाते. नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी योग साधकांचे मन ' स्वाधिष्ठान ' (Swadhisthan) चक्रावर केंद्रित करावे. ब्रम्हचारीणी देवीचे तत्व स्वाधिष्ठान चक्रात असून  मातेची कृपा व भक्ती साधकाला लवकर प्राप्त होते. 
                        पौराणिक कथांमध्ये ब्रम्हचारीणी मातेची कथा प्रसिद्ध आहे. माता ब्रम्हचारीणी हिमालय व राणी मैना यांची कन्या आहे. एकदा महर्षी नारद यांनी माता ब्रम्हचारीणीला महादेवाची आराधना करायला सांगितली. मातेने केलेल्या घोर तपश्चर्येचा आशीर्वाद म्हणून साक्षात भगवान शिव शंकर यांचेशी विवाह झाला. जो भक्त भक्तिपूर्ण मनाने या देवीचे पूजन करतो त्याला उच्च आध्यात्मिक व आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. तसेच जे योग साधक या दिवशी मातेची उपासना करतात त्यांना सर्व इंद्रियांवर प्रभुत्व प्राप्त होते. व साधकाला निर्वाण पदाची मोक्षाची प्राप्ती होते. 
                      जो साधक ब्रम्हचारीणी मातेची पंचोपचार पूजा विधी करतो व स्वाधिष्ठान चक्रामध्ये मनाला स्थापित करतो , ध्यान करतो. त्याची साधना सफल होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते.   

श्लोक
या देवी सर्वभू‍तेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

ध्यान मंत्र
वन्दे वांछित लाभायचन्द्रार्घकृतशेखराम्।
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥

गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
परम वंदना पल्लवराधरां कांत कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥
स्तोत्र पाठ 
तपश्चारिणी त्वंहि तापत्रय निवारणीम्।
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
शंकरप्रिया त्वंहि भुक्ति-मुक्ति दायिनी।
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणीप्रणमाम्यहम्॥
कवच :
त्रिपुरा में हृदयं पातु ललाटे पातु शंकरभामिनी।
अर्पण सदापातु नेत्रो, अर्धरी च कपोलो॥
पंचदशी कण्ठे पातुमध्यदेशे पातुमहेश्वरी॥
षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।
अंग प्रत्यंग सतत पातु ब्रह्मचारिणी।

गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला कडून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छया !!!!



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...