दुर्गा नवरात्र दुसरा दिवस
ब्रम्हचारीणी माता
नवरात्र मधील नऊ दिवसातील विविध नऊ रूपांमध्ये दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी मातेचे पूजन केल्या जाते . ब्रम्हचारीणी मातेची उपासना केल्याने तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या गुणांमध्ये विशेष वाढ होते. ब्रम्हचारीणी मातेच्या कृपेने मानवाला सर्व ठिकाणी विजय व सिद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील समस्या व अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते.
ब्रम्हचारीणी मातेचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आहे. दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रम्हचारीणी हे दुसरे रूप आहे. पहिले रूप शैलपुत्री आहे. शैलपुत्री मातेचे पूजन नवरात्रात पहिल्या दिवशी घटस्थापने नंतर करतात. ब्रम्हचारीणी म्हणजे तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या आचरण करणारी. हि देवी सदैव तपा मध्ये शांत व निमग्न होऊन तल्लीन असते. मातेचे मुख तपाच्या सामर्थ्याने तेज व कांतीने झळाळून तिन्ही लोकांमध्ये उठून दिसते.
ब्रम्हचारीणी मातेच्या उजव्या हातात माळ आहे व डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. माता ब्रह्मचारिणी साक्षात ब्रम्हरूप म्हणजेच तपशेची मूर्ती आहे. यामुळे या देवीचे आणखी नाव सुद्धा आहेत. तपचारिणी, अपर्णा व उमा या नावाने सुद्धा मातेला ओळखले जाते. नवरात्र उत्सवातील दुसऱ्या दिवशी योग साधकांचे मन ' स्वाधिष्ठान ' (Swadhisthan) चक्रावर केंद्रित करावे. ब्रम्हचारीणी देवीचे तत्व स्वाधिष्ठान चक्रात असून मातेची कृपा व भक्ती साधकाला लवकर प्राप्त होते.
पौराणिक कथांमध्ये ब्रम्हचारीणी मातेची कथा प्रसिद्ध आहे. माता ब्रम्हचारीणी हिमालय व राणी मैना यांची कन्या आहे. एकदा महर्षी नारद यांनी माता ब्रम्हचारीणीला महादेवाची आराधना करायला सांगितली. मातेने केलेल्या घोर तपश्चर्येचा आशीर्वाद म्हणून साक्षात भगवान शिव शंकर यांचेशी विवाह झाला. जो भक्त भक्तिपूर्ण मनाने या देवीचे पूजन करतो त्याला उच्च आध्यात्मिक व आत्मिक आनंदाची प्राप्ती होते. तसेच जे योग साधक या दिवशी मातेची उपासना करतात त्यांना सर्व इंद्रियांवर प्रभुत्व प्राप्त होते. व साधकाला निर्वाण पदाची मोक्षाची प्राप्ती होते.
जो साधक ब्रम्हचारीणी मातेची पंचोपचार पूजा विधी करतो व स्वाधिष्ठान चक्रामध्ये मनाला स्थापित करतो , ध्यान करतो. त्याची साधना सफल होऊन कुंडलिनी शक्ती जागृत होते.
श्लोक
या देवी सर्वभूतेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।
ध्यान मंत्र
वन्दे वांछित
लाभायचन्द्रार्घकृतशेखराम्।
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥
जपमालाकमण्डलु धराब्रह्मचारिणी शुभाम्॥
गौरवर्णा स्वाधिष्ठानस्थिता
द्वितीय दुर्गा त्रिनेत्राम।
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
धवल परिधाना ब्रह्मरूपा पुष्पालंकार भूषिताम्॥
परम वंदना पल्लवराधरां कांत कपोला पीन।
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥
पयोधराम् कमनीया लावणयं स्मेरमुखी निम्ननाभि नितम्बनीम्॥
स्तोत्र
पाठ
तपश्चारिणी त्वंहि तापत्रय
निवारणीम्।
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
ब्रह्मरूपधरा ब्रह्मचारिणी प्रणमाम्यहम्॥
शंकरप्रिया त्वंहि
भुक्ति-मुक्ति दायिनी।
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणीप्रणमाम्यहम्॥
शान्तिदा ज्ञानदा ब्रह्मचारिणीप्रणमाम्यहम्॥
कवच :
त्रिपुरा में हृदयं पातु
ललाटे पातु शंकरभामिनी।
अर्पण सदापातु नेत्रो, अर्धरी च कपोलो॥
अर्पण सदापातु नेत्रो, अर्धरी च कपोलो॥
पंचदशी कण्ठे पातुमध्यदेशे
पातुमहेश्वरी॥
षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।
षोडशी सदापातु नाभो गृहो च पादयो।
अंग प्रत्यंग सतत पातु
ब्रह्मचारिणी।
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला कडून नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छया !!!!

Very nice
उत्तर द्याहटवाधन्यवाद आपल्याला नेहमीच अश्या प्रकारचे लेखन साहित्य या ब्लॉग वर वाचायला मिळेल. 💐 💐
उत्तर द्याहटवा