मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

व्यवसायात यशस्वी होण्या साठी Chanakya Niti- how to success in business

व्यवसायात यशस्वी होण्या साठी 

नवीन ओळख झाल्यावर एखाद्याची नीट चौकशी करण्याच्या आधीच आपण आपल्या Idea लोकांना Share करण्या आधीच पैश्याच बोललो तर बर पडते . यातून राग येत नाही. वेळ वाया जात नाही. महत्वाच म्हणजे समोरच्याला आपला concept समजत नाही. काही लोक व्यवसायात अतिशय चिकट व कंजूष असतात.
 असे लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याची क्षमता स्वतःजवळ बाळगतात.
त्यामुळे अश्या हुशार लोकांना तोंडी जरी तुमच्या व्यावसायिक Idea मिळाल्या  तरी त्यांच्यासाठी फायदा करून देणार असत.

      म्हणून कदाचित आचार्य चाणक्य यांनी सांगितलं असेल आपल्या योजना नेहमी गुप्त ठेवा .

how to success in business

१) आर्थिक नुकसान

                सर्वाना माहीतच आहे कि आचार्य चाणक्य प्राचीन भारतामधील राजकारण व अर्थशास्त्र यामधील
प्रसिद्ध विद्वानांमधील एक आहेत. चाणक्य यांनी चार गोष्टी जे नेहमी गुप्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत .
आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या वेळी व्यवसायातून व्यापारातून आपल्याला आर्थिक नुकसान अर्थ हानी झाली असेल. तर अशी गोष्ट तुम्ही कोणासोबतच Share करू नका . यातून आपले झालेले आर्थिक नुकसान भरून निघणार नाही उलट झालेल्या गोष्टीवरून समोरचा तुम्हाला मान प्रतिष्ठा देणार नाही . समोरचा व्यक्ती कितीही जवळचा असला तरी तुमच्या पासून लांब जाऊ शकतो . त्यामुळे हि गोष्ट गुप्त ठेवावी असे आचार्य सांगतात .

२) मानसिक वेदना

         जर तुम्हाला एखादया गोष्टीमुळे मानसिक वेदना झाल्या असतील तर अशी गोष्ट सुद्धा तुम्ही लोकांना सांगू नका. कारण सर्वच लोक चांगल्या मनाची नसतात . यातून ती व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे मनातील दुःख कोणापुढे सांगू नका. मनाने खंबीर असलेले लोकच जग जिंकतात. प्रत्येक यशस्वी व्यक्ती हा भावनिक होऊन चालत नाही. ज्यांना तुम्ही स्वतःच्या मनातील वेदना सांगता ती व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करू शकते. यातून शेवटी आपल्याला जास्तच दुःख होणार.

३) घरातील खाजगी गोष्टी

           कधीकधी आपण आपल्या मित्र परिवार नातेवाईक किंवा शेजारी यांच्या सोबत घरातील काही खाजगी बाबी व्यक्त करतो. आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे कि कुटुंबातील खाजगी बाबी बाहेर कोणालाही समजू देऊ नका. त्या पूर्ण पणे गुप्त ठेवा. विशेषता life partner पत्नी बदल काहीही सांगू नका . असे केल्यास तुमच्या व्यक्तिमत्वाला मान प्रतिष्ठेला धक्का लागतो . भविष्यात बऱ्याच गोष्टी यावर अवलंबून असतात. so त्यामुळे  घरातील प्रायव्हेट गोष्टी बाहेर सांगू नका .

४) झालेला अपमान

            आचार्य चाणक्य यांच्या मते ज्ञानी मनुष्य तो असतो. जो मान अपमान सारखाच समजतो . त्यामुळे जर तुमचा कुठे अपमान झाला असेल तर ते कृपया गुप्तच ठेवा. झालेला अपमान पचवा . जर तुम्ही तुमच्या झालेल्या अपमानाची कुठे दुसरीकडे चर्च्या केली तर तुमच्या अपमाणात आणखी वाढ होते. काही व्यक्ती असे असतात जे झालेली गोष्ट दिवसभर सगळ्यांना सांगत सुटतात . त्यातून काहीच मिळत नाही उलट भविष्यात यापासून त्रास आणखी जास्त वाढतो.

      म्हणूनच माझ्या वाचकांना नम्र विनंती आहे कि आपणही आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या ह्या चार गोष्टी कायम स्वतःजवळ ठेवा. म्हणजे गुप्त ठेवा .

१) आर्थिक नुकसान
२) मानसिक वेदना
३) घरातील खाजगी गोष्टी
४) झालेला अपमान

व्यवसायात व्यापारात उन्नती करण्यासाठी या गोष्टी कायम ठेवा .

धन्यवाद
Vastu Vastushastra Map Marathi Bussines
Add caption

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...