मित्र
मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते. माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.
काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.
मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.
संकटात मित्राची खरी ओळख पटते. माणसाने कोणाकडूनच फार अपेक्षा करू नयेत. आपल्यावर आलेल्या संकटातून बाहेर निघण्यासाठी प्रत्येकच व्यक्ती तुम्हाला आर्थिक भरघोस मदत करेलच असे नाही. अश्या वेळी सहानुभूती महत्वाची. मित्रत्वाचा हात खंबीर हवा.
आपला मित्र चालेल पण तो चांगला सल्लागार असला पाहिजे.सगळेच मित्र जीवनात सल्लागार असतात. पण परिस्थितीचा अंदाज सगळ्यांचाच १००% शम्भर टक्के बरोबर कधीच कोणाचाच नसतो. त्यामुळे मित्रांचा सल्ला नक्कीच घ्यायचा.
आपले मित्र मंडळ जेवढे जास्त तेव्हढा फायदा जास्त आणि नात्याची श्रीमंती त्याचे जवळ जास्त. आपले मित्र मंडळ जेवढे जास्त तेवढा फायदा जास्त नात्याची श्रीमंती त्यांचे जवळ जास्त आजकाल सोशल मीडियावर लाखाने फ्रेंडलिस्टमध्ये जमा असलेल्या पेक्षा यापासून दूर असून आपल्या आवाजाला ओ देणारा घराजवळचा मित्र बरा. त्यामुळे आपण जिथे राहतो तिथे जास्तीत जास्त मित्र तयार करा. मित्र तयार करायला दोघांचे विचार सारखे पाहिजे ही एक चुकीची समजूत काही माणसांची झाली असते. त्यांना असं वाटते की मित्र फक्त समान विचाराचे, समान वयाचे, समान शैक्षणिक पात्रतेचे असतात, असे काही नाही.
मित्र ही एक मनातील भावना आहे. त्याला लिंग, वय, भाषा, शिक्षण, वंश हा भेद नसतो. किंबहुना हा भेद कोणी पडू नये. मनमोकळेपणे बोलण्यासाठी निसर्ग हा सुद्धा खूप चांगला मित्र आहे. अलीकडच्या काळात या चांगल्या मित्रापासून सर्व लोक दूर जात आहेत.
एखाद्या झाडाखाली त्याच्या शांत गर्द सावलीत बसून पहा, त्याची मैत्री तो तुम्हाला देईल. खूप तहान लागल्यावर शेतातील विहिरीतून पाणी काढून प्या , ती विहीर तुम्हाला मैत्री देईल. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या उजेडात रस्त्याने चालून पहा, तो चंद्र तुम्हाला मित्र वाटेल. उन्हाळ्यात घराबाहेर किंवा घराच्या टेरेसवर झोपून पहा, सकाळी सूर्य तुम्हाला झोपेतून उठवत असल्याचे जाणवेल. निसर्गाने दिलेल्या प्रत्येक सजीव निर्जीव दृश्य-अदृश्य गोष्टींना मित्र म्हणून स्वीकार करा. आणि मग पहा तुमची फ्रेंडलिस्ट किती मोठी आहे.
सगळे मित्र फक्त तुमच्यासाठी आहेत त्या सगळ्यांच्या मैत्रीचा स्वीकार करत त्या मैत्रीचा आदर करा. मन मोकळं करण्यासाठी जेव्हा तुम्ही त्यांच्या सहवासात जाल तेव्हा ते तुमचे आदर सहित स्वागत करतील. तेव्हा त्यांना तुमच्या मनातील दुःख सांगा. निसर्गात मोठी शक्ती असते. तुमच्या दुःखावर फक्त हा मित्र फोन करणार नाही तर ते नाही शुद्ध करेल तेव्हा तुम्ही कितीही मोठ्या संकटात असा, कोणताही विचार तुमच्या डोक्यात असुद्या, जर मनात आत्महत्या करण्याचा विचार करत असाल तर गाव शहरापासून दूर जाऊन यांनी सर्व मित्राला आधी भेटा उपाय त्याच्याकडे नक्कीच मिळेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा