सुख आणि दुःख
खूप दिवस झाले Social Media वर online राहतो पण मन शांत होत नाही . जास्तीत जास्त व्यथीत होते . लाख लोकांना होणारा आनंद यातून दिसते म्हणून नाही तर करोडो लोकांचे दुःख हि पाहता येते म्हणून. यावर हजारो मित्रांना एकाच वेळी मित्र बनवता येते . आयुष्यात कधीच न भेटता पण आपल्याला खूप मित्र मैत्रीणी या तयार करता येतात . त्यांचे सुख दुःख माहित करुंन घेता येतात , पण उपयोग काय ?????
आपल्या घरात आपण एकटेच असतो . घराच्या दरवाज्यात तर कोणताच मित्र उभा नसतो . अश्या वेळी वाटते नक्कीच कुठे तरी काहीतरी चुकत आहे . आज आपल्याला Friend शोधावे लागतात आपल्या इनबॉक्स मध्ये आणि त्यांच्या समस्या माहित होतात आलेल्या Notification मध्ये . हा सगळं मायाजाल आहे . एखाद्याला थोडं जरी दुःख झालं , कोणाला घरी करमत नसेल असं एखाद्या न फक्त लिहायचा अवकाश कि , सहानुभूतीची जणू स्पर्धा सुरु होते . घरातील आई वडील भाऊ बहीण यांची घेत नसेल इतकी काळजी घेतल्या जाते . उपचाराचे dose दिल्या जातात . पण मला सांगा खरच जो संकटात आहे , जो एकटा आहे त्याला तुमच्या मैत्रीचा हात आणि सहानुभूतीची नजर पाहिजे असते कि , तुमच्या Message मधून गेलेल्या डबडबल्या पाणावलेल्या डोळ्यांची Emoji पाहिजे असते . एखाद्याला धीर देतांना हळवं व्हायचं असते कि , मित्राला नातेवाईकाला आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्या साठी खंबीर दिसणे गरजेचे असते . तुमचे रडके तोंड पाहून तर मित्र तुम्हालाच मदत मागणार नाही . Social Media वर भेटलेले मित्र मनाचा ठाव घेऊ शकतील का ???
म्हणून सुख असो कि दुःख आप्तस्वकीय म्हणून मित्र जोपर्यंत एकमेकाला वेळ देणार नाही तो पर्यंत या नात्यांना किंमत येणार नाही . त्यासाठी नुसत्या Sad Emoji आता चालणार नाही . जगात असे खूप एकाकी जगणारे लोक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायची गरज आहे. मग आपण अशी अपेक्षा कशी ठेऊ शकतो कि त्यांनी त्यांचं सुख Social Media वर Screen समोर हातात Mouse पकडून शोधायला पाहिजे का ???
काही लोकांना हे जमणार नाही म्हणून काय त्यांनी एकाकी जीवन जगायचं का ??? त्यांना जर आपण मित्र म्हणून स्वीकारलं त्यांच्या सोबत मैत्रीच नातं तयार केलं तरच आपण त्यांच्या जीवनात परत आनंद आणू शकू . हे सर्व Internet च्या स्क्रीन समोर शक्य होणार नाही. या साठी आपल्याला त्यांच्या पर्यंत पोहचा लागेल . हे आपल्याला एखाद्या बगिच्यातील बाकावर भेटतील , एखाद्या मंदिरात ओटयावर बसलेले दिसतील , एखादया दवाखान्यात दिसतील , इतर ठिकाणी जिथे आपण अजून पोहचलो नसेल तिथे हे असतील अश्या सर्वाना आपल्या मैत्रीची आवश्यकता असू शकते . त्यामुळे त्यांना मित्र म्हणून स्वीकारावे लागेल . जस आपण इंटरनेट वर Social Media वर मित्र कोणत्याही वयोगटातील तयार करतो. त्यात आपल्या लिस्ट मध्ये स्त्री-पुरुष समान असतात. तसच प्रत्येक्ष जीवन जगतांना सुद्धा खर आपल्याला तरी वृद्ध वयस्कर व्यक्ती सोबत जुळवून घेता येते का ते पाहणे गरजेचे ठरेल. Facebook च्या profile photo कितीही प्रफुल्लित ठेवला तरी वास्तविक जीवनात एखादया आजी बाईला मदत करतांना आपण तेवढेच प्रफुल्लित स्मित करू शकतो का ते पण पाहणे गरजेचे ठरेल.
जगात सुखी होण्या साठी माणसाने भरपूर साधने तयार केली. त्या साधनान सोबतच साधन तयार करणाऱ्या गोष्टी तयार झाल्या. माणसानेच तयार केलेला हा सगळा पसारा तस पहाल तर फक्त सुखासाठीच होता . पण त्यात प्रत्येक जण गुंतून पडला. जे सुख पाहिजे होत ते केवळ मूठभर लोकांच्या नशिबी आल. खूप मोठी जनता अजूनही साधनांच्या बंदोबस्तासाठीच कार्य करते. त्यांना स्वतःच्या सुखाचा मार्ग काही केल्या सापडत नाही . ज्यांना सुख सापडलं किंवा जे सुखी दिसतात ते सामान्य माणसाला जवळ येऊ देत नाहीत .
या लेखातील सर्व मजकूर माझ्या अनुभवातून आलेला आहे . आपण यावर चर्चा करू शकता .
श्री नितीन मरकाळे
वास्तु सलाहकार
मोबाईल क्र ०८४०८९४३९९३
हल्ली मनुष्यालाचा याच इंटरनेटमुळे एकलकोंडेपणा वाढत आहे,आणि त्याचेच रूपांतरण मानसिक व्याधिंमध्ये होतेय जसे डिप्रेशन,blood pressure insomini इत्यादी इत्यादी .....पूर्वी लोक viral diseases मुळे बाधीत व्हायचे पण आज psychosomatic diseases खूप बलवत्तर झाले आहेत आणि याला जवाबदार आहे tv, इंटरनेट आणि इंटरनेट वरील video games ....खेदाची गोष्टं अशी कि विदेशी लोकांची संस्कृती कॉपी करण्याच्या चक्कर मध्ये आपण स्वतःची महान भारतीय संस्कृती च विसरलो आहे
उत्तर द्याहटवाVery nice write
उत्तर द्याहटवाआजकाल लोक आपल्या सुख दुःखात जे Online सहभागी होतात त्यांच्या साठी हा लेख अतिशय उत्तम आहे
उत्तर द्याहटवा