मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

सुख आणि दुःख

सुख आणि दुःख 

                        खूप दिवस झाले Social Media  वर online राहतो पण मन शांत होत नाही . जास्तीत जास्त व्यथीत होते . लाख लोकांना होणारा आनंद यातून दिसते म्हणून नाही तर करोडो लोकांचे दुःख हि पाहता येते म्हणून. यावर हजारो मित्रांना एकाच वेळी मित्र बनवता येते . आयुष्यात कधीच न भेटता पण आपल्याला खूप मित्र मैत्रीणी या तयार करता येतात . त्यांचे सुख दुःख माहित करुंन घेता येतात , पण उपयोग काय ?????
                      आपल्या घरात आपण एकटेच असतो . घराच्या दरवाज्यात तर कोणताच मित्र उभा नसतो . अश्या वेळी वाटते नक्कीच कुठे तरी काहीतरी चुकत आहे . आज आपल्याला Friend शोधावे लागतात आपल्या इनबॉक्स मध्ये आणि त्यांच्या समस्या माहित होतात आलेल्या Notification मध्ये . हा सगळं मायाजाल आहे . एखाद्याला थोडं जरी दुःख झालं , कोणाला घरी करमत नसेल असं एखाद्या न फक्त लिहायचा अवकाश कि , सहानुभूतीची जणू स्पर्धा सुरु होते . घरातील आई वडील भाऊ बहीण यांची घेत नसेल इतकी काळजी घेतल्या जाते . उपचाराचे dose दिल्या जातात . पण मला सांगा खरच जो संकटात आहे , जो एकटा आहे त्याला तुमच्या मैत्रीचा हात आणि सहानुभूतीची नजर पाहिजे असते कि , तुमच्या Message मधून गेलेल्या डबडबल्या पाणावलेल्या डोळ्यांची Emoji पाहिजे असते . एखाद्याला धीर देतांना हळवं व्हायचं असते कि , मित्राला नातेवाईकाला आहे त्या परिस्थितीतून बाहेर काढण्या साठी खंबीर दिसणे गरजेचे असते . तुमचे रडके तोंड पाहून तर मित्र तुम्हालाच मदत मागणार नाही .  Social Media वर भेटलेले मित्र मनाचा ठाव घेऊ शकतील का ??? 

 कारण वेळ आहे कोना कडे तुमचे  Notification त्यांना दिसणे हा केवळ योगायोग असतो. मग याच कारणाने माझ्या सारख्या हळव्या मनात प्रश्न येतो कि , हे जग खरच सुखी आहे का दुखी . तस पहाल तर हे जग सुखीच आहे . पण आपण मात्र सुख शोधतो Internet असलेल्या २१" स्क्रिन वर . आज इंटरनेट वर तेच टाकल्या जाते जे विकल्या जाते . जगात तेच नेहमी हमखास विकल्या जाते ज्यातून माणसाला सुख मिळते . म्हणजेच माणूस नेहमी स्क्रिन वर सुखाच्या शोधात असते . दुःख कोणीच कोणाचं घ्यायला तयार नसते .

                           म्हणून सुख असो कि दुःख आप्तस्वकीय म्हणून मित्र जोपर्यंत एकमेकाला वेळ देणार नाही तो पर्यंत या नात्यांना किंमत येणार नाही . त्यासाठी नुसत्या Sad Emoji आता चालणार नाही . जगात असे खूप एकाकी जगणारे लोक आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणायची गरज आहे. मग आपण अशी अपेक्षा कशी ठेऊ शकतो कि त्यांनी त्यांचं सुख Social Media वर Screen समोर हातात Mouse पकडून शोधायला पाहिजे का ???
काही लोकांना हे जमणार नाही म्हणून काय त्यांनी एकाकी जीवन जगायचं का ??? त्यांना जर आपण मित्र म्हणून स्वीकारलं त्यांच्या सोबत मैत्रीच नातं तयार केलं तरच आपण त्यांच्या जीवनात परत आनंद आणू शकू . हे सर्व Internet च्या स्क्रीन समोर शक्य होणार नाही. या साठी आपल्याला त्यांच्या पर्यंत पोहचा लागेल . हे आपल्याला एखाद्या बगिच्यातील बाकावर भेटतील , एखाद्या मंदिरात ओटयावर बसलेले दिसतील , एखादया दवाखान्यात दिसतील , इतर ठिकाणी जिथे आपण अजून पोहचलो नसेल तिथे हे असतील अश्या सर्वाना आपल्या मैत्रीची आवश्यकता असू शकते . त्यामुळे त्यांना मित्र म्हणून स्वीकारावे लागेल . जस आपण इंटरनेट वर Social Media वर मित्र कोणत्याही वयोगटातील तयार करतो. त्यात आपल्या लिस्ट मध्ये स्त्री-पुरुष समान असतात. तसच प्रत्येक्ष जीवन जगतांना सुद्धा खर आपल्याला तरी वृद्ध वयस्कर व्यक्ती सोबत जुळवून घेता येते का ते पाहणे गरजेचे ठरेल. Facebook च्या profile photo कितीही प्रफुल्लित ठेवला तरी वास्तविक जीवनात एखादया आजी बाईला मदत करतांना आपण तेवढेच  प्रफुल्लित स्मित करू शकतो का ते पण पाहणे गरजेचे ठरेल.
जगात सुखी होण्या साठी माणसाने भरपूर साधने तयार केली. त्या साधनान सोबतच साधन तयार करणाऱ्या गोष्टी तयार झाल्या. माणसानेच तयार केलेला हा सगळा पसारा तस पहाल तर फक्त सुखासाठीच होता . पण त्यात प्रत्येक जण गुंतून पडला. जे सुख पाहिजे होत ते केवळ मूठभर लोकांच्या नशिबी आल. खूप मोठी जनता अजूनही साधनांच्या बंदोबस्तासाठीच कार्य करते. त्यांना स्वतःच्या सुखाचा मार्ग काही केल्या सापडत नाही . ज्यांना सुख सापडलं किंवा जे सुखी दिसतात ते सामान्य माणसाला जवळ येऊ देत नाहीत .


या लेखातील सर्व मजकूर माझ्या अनुभवातून आलेला आहे . आपण यावर चर्चा करू शकता .

श्री नितीन मरकाळे
वास्तु सलाहकार
मोबाईल क्र ०८४०८९४३९९३

टिप्पण्या

  1. हल्ली मनुष्यालाचा याच इंटरनेटमुळे एकलकोंडेपणा वाढत आहे,आणि त्याचेच रूपांतरण मानसिक व्याधिंमध्ये होतेय जसे डिप्रेशन,blood pressure insomini इत्यादी इत्यादी .....पूर्वी लोक viral diseases मुळे बाधीत व्हायचे पण आज psychosomatic diseases खूप बलवत्तर झाले आहेत आणि याला जवाबदार आहे tv, इंटरनेट आणि इंटरनेट वरील video games ....खेदाची गोष्टं अशी कि विदेशी लोकांची संस्कृती कॉपी करण्याच्या चक्कर मध्ये आपण स्वतःची महान भारतीय संस्कृती च विसरलो आहे

    उत्तर द्याहटवा
  2. आजकाल लोक आपल्या सुख दुःखात जे Online सहभागी होतात त्यांच्या साठी हा लेख अतिशय उत्तम आहे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...