मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi

प्रेरणादायी विचार Motivational Quotes in Marathi    लिखाणाचे बरेच फायदे आहेत तुमच्या डोक्यात जे काही विचार येतात ते एखादे वेळी त्रासदायक असतात. यातून आरोग्य बिघडू शकते. हे विचार कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे असतात. त्यामुळे जर ते काही आपल्या डोक्यात सुरु आहे ते कागदावर लिहून ठेवावे. कागदावर ठेवल्यामुळे किंवा लिहिल्यामुळे  मेंदूला हलके वाटायला लागेल. जास्त त्रास जाणवणार  नाही. मी हा उपाय माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात खुद्द करून पाहाल  आहे. यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता नसते. बस काही पान  घ्या, नेहमीचा पेन घ्या , तुमचे नेहमी चे बसण्याचे ठिकाण चालेल. अगदी गोंधळ गोंगाटाच्या ठिकाणी  असले तरीही चालेल. मी व लोणार सरोवर येथील शिवमंदिर                                                   आता असं समजा की तुमच्या समोर एक तुमच्यापेक्षा लहान मित्र बसला आहे. आणि त्याला तुम्ही काहीतरी आलेला अनुभव सांगत आहे. तुम्ही विचार...

विदिशा Intermediate Compass प्लॉट परिणाम

विदिशा Intermediate Compass प्लॉट परिणाम   विदिशा प्लॉट परिणाम नमस्कार , आज आपण वास्तुशास्त्रानुसार विदिशा प्लॉट चे काय परिणाम होतात त्याबद्दल पाहणार आहोत. विदिशा प्लॉट म्हणजे ज्या मुख्य दिशा आहेत पूर्व-पश्चिम उत्तर-दक्षिण या दिशेने आपला प्लॉट जर नव्वद अंशाच्या कोणामध्ये नसेल व उपदिशेकडे झुकलेला असेल मुख्य दिशेला घराचे प्रांगण प्रवेश न येत. उपदिशेतून घराचे मुख्य आगमन निर्गमन होत असेल , तर अशा वेळेस त्या प्लॉटला विदिशा भूखंड प्लॉट असे म्हणतात . विदिशा प्लॉट मध्ये ईशान आग्नेय नेऋत्य किंवा वायव्य या दिशेनं मुख्य रस्त्याला सोबत प्लॉटची एक बाजू जोडलेली असते. विविध दिशेनुसार त्याचे वास्तुशास्त्र च्या अभ्यासानुसार वेगवेगळे फळ मिळतात. यामध्ये आपण पाहणार आहोत की ज्या उपदिशा आहेत त्यानुसार भूखंड या रस्त्याला जोडलेला असेल त्यानुसार वास्तु मध्ये राहणाऱ्या सदस्यवर काय परिणाम होतात. बऱ्याच विदिशा घरांच्या vastu visit केल्यावर असे आढळून आले आहे की विविध दिशात शुभाशुभ परिणाम वेगवेगळे आहेत. Vidisha Plot ईशान्य North East (Eshanya) - ज्या घराला उत्तर पूर्व दिशेच्या मधून ...

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टक व आरती

तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टक व आरती  तुळशीच्या लग्नाची मंगलाष्टकं स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं , मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं , चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं , विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः , कुर्यात् सदा मङ्गलं || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना , गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी , ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता , कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो , रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं , शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम , कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। राजा भीमक रुख्मिणीस नयनी , देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा , कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा , त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे , कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे , अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजा...

घर बांधकामाच्या वास्तु टिप्स Vastu shastra Tips For Building Construction

घर बांधकामाच्या वास्तु टिप्स Vastu shastra Tips For Building Construction  Proposed Construction As Per Vastu   नमस्कार मित्रांनो, जर आपण नवीन घर बांधकाम Construction करत असाल किंवा नवीन घर विकत Purchase  घेत असाल. तर अशा वेळी वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत किंवा वास्तुशास्त्राच्या काही ज्या टिप्स  आहेत . त्या मी तुम्हाला आज सांगत आहे. Vastu shastra Tips For Construction                         त्यातील पहिली गोष्ट अशी की, जर आपण राहण्यासाठी म्हणजेच Residential किंवा व्यावसायिक हेतूने म्हणजेच Commercial कमर्शियल बिल्डिंग यासाठी जमीन घेत असाल त्या जमीन किंवा भूखंड हा वास्तुशास्त्राचे सिद्धांत भू परीक्षणासाठी आहेत त्यानुसार असणे आवश्यक आहे.  जर आपण तयार असलेले घर किंवा एखाद्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील दुकान घेत असू अशावेळी त्या भूखंडाची संबंधित व झालेल्या बांधकाम शी संबंधित वास्तु नियम पाळले गेलेत की नाही हे पाहूनच खरेदी करावी.  जर आपण रि...

व्यवसायात यशस्वी होण्या साठी Chanakya Niti- how to success in business

व्यवसायात यशस्वी होण्या साठी  नवीन ओळख झाल्यावर एखाद्याची नीट चौकशी करण्याच्या आधीच आपण आपल्या Idea लोकांना Share करण्या आधीच पैश्याच बोललो तर बर पडते . यातून राग येत नाही. वेळ वाया जात नाही. महत्वाच म्हणजे समोरच्याला आपला concept समजत नाही. काही लोक व्यवसायात अतिशय चिकट व कंजूष असतात.  असे लोक सुतावरून स्वर्ग गाठण्याची क्षमता स्वतःजवळ बाळगतात. त्यामुळे अश्या हुशार लोकांना तोंडी जरी तुमच्या व्यावसायिक Idea मिळाल्या  तरी त्यांच्यासाठी फायदा करून देणार असत.       म्हणून कदाचित आचार्य चाणक्य यांनी सांगितलं असेल आपल्या योजना नेहमी गुप्त ठेवा . how to success in business १) आर्थिक नुकसान                 सर्वाना माहीतच आहे कि आचार्य चाणक्य प्राचीन भारतामधील राजकारण व अर्थशास्त्र यामधील प्रसिद्ध विद्वानांमधील एक आहेत. चाणक्य यांनी चार गोष्टी जे नेहमी गुप्त ठेवण्यासाठी सांगितल्या आहेत . आचार्य चाणक्य यांच्या मते जर एखाद्या वेळी व्यवसायातून व्यापारातून आपल्याला आर्थिक नुकसान अर्थ हानी झाली असेल. तर अशी गोष्...

अपार्टमेंट फ्लॅट साठी वास्तुशास्त्र

अपार्टमेंट फ्लॅट साठी वास्तुशास्त्र  आज लोकसंख्येच्या प्रचंड प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रत्येकाला आपले घर व्हावे असे वाटत असले तरी शक्य होत नाही . या प्रचंड स्पर्धेच्या युगात मानवाला राहायला घर मिळणे मोठी गोष्ट झाली आहे . प्रत्येकाला जमिनीवरील प्लॉट मिळेलच असे नाही . यासाठी अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेण्याचे प्रमाण वाढले आहे . यामुळे आपल्या आर्थिक परिस्थिती अनुरूप , बांधकाम व्यावसायिक देत असलेल्या सोई सुविधा ने युक्त फ्लॅट घेतल्या जात आहेत . जर एक अपार्टमेंट म्हणजेच एक घर असेल तर त्या घरातील प्रत्येकच रूम वास्तुशास्त्रानुसार असेलच असे नाही . त्यामुळे आपण असे म्हणू शकतो कि फ्लॅट मध्ये पूर्णतः शास्त्रानुसार वास्तू पाहणे शक्य नाही . तरी पण बऱ्याच प्रमाणात पाहता येणे शक्य आहे . कोणताही फ्लॅट विकत घेण्या अगोदर आपण तो वास्तू सम्मत आहे कि नाही हे वास्तु परीक्षण करून पाहू शकतो . जर आपल्याला पाहिजे असलेल्या ६० ते ७० टक्के वास्तु नियम त्यामध्ये पूर्ण होत असल्यास व्यवहार करायला काही अडचण येत नाही .  फ्लॅट विकत घेतांना  जर मुख्य दरवाजा कोणत्याही अशुभ दिशा स्थानावर उघडत असेल तर अस...

दुर्गा नवरात्र दुसरा दिवस

दुर्गा नवरात्र दुसरा दिवस  ब्रम्हचारीणी माता                       नवरात्र मधील नऊ दिवसातील विविध नऊ रूपांमध्ये दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारीणी मातेचे पूजन केल्या जाते . ब्रम्हचारीणी मातेची उपासना केल्याने तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या गुणांमध्ये विशेष वाढ होते. ब्रम्हचारीणी मातेच्या कृपेने मानवाला सर्व ठिकाणी विजय व सिद्धी प्राप्त होते. तसेच जीवनातील समस्या व अनेक प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते.                      ब्रम्हचारीणी मातेचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय  आहे. दुर्गा देवीच्या नऊ रूपांपैकी ब्रम्हचारीणी हे दुसरे रूप आहे. पहिले रूप शैलपुत्री आहे.  शैलपुत्री मातेचे पूजन नवरात्रात पहिल्या दिवशी घटस्थापने नंतर करतात. ब्रम्हचारीणी म्हणजे  तप, त्याग, सदाचार, वैराग्य व संयम या आचरण करणारी. हि देवी सदैव तपा मध्ये शांत व निमग्न होऊन तल्लीन असते. मातेचे मुख तपाच्या सामर्थ्याने तेज व कांतीने झळाळून तिन्ही लोकांमध्ये उठून दिसते.  ...