मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

शिकवण भगवान बुद्धाची

*🍀तथागत बुद्धांची शिकवण🍀*

🌀१) मूर्खांची संगती करु नका.
🌀२) विद्वानांची संगती करा.
🌀३) आदरणीय व्यक्तींचा आदर करा.
🌀४) अनुकूल देशात निवास करा.
🌀५) चांगली कामे करा.
🌀६) चित्तास स्थिर ठेवा.
🌀७) अनेक विषयांचे ज्ञान असू द्या.
🌀८) विद्वान व्हा.
🌀९) संयमी राहा.
🌀१०) बोलणे मधुर व सत्य असू द्या.
🌀११) मातापित्याची सेवा करा.
🌀१२) पत्नी व पुत्राचे पालनपोषण करा.
🌀१३) उपजीविकेचे साधन नि:संशयी व सुस्पष्ट असू द्या.
🌀१४) दानधर्म करा.
🌀१५) धम्माचरण करा.
🌀१६) नातेवाइकांशी चांगले संबंध ठेवून त्यांना वेळोवेळी मदत करा.
🌀१७) निर्दोष कर्मे करा.
🌀१८) पापकर्मापासून अलिप्त राहा.
🌀१९) मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य करा.
🌀२०) धम्म कार्यात प्रमादरहित असा.
🌀२१) गौरवाची भावना जोपासा.
🌀२२) मनाच्या शांतीची जोपासना करा.
🌀२३) क्षमाशील असा.
🌀२४) संतुष्ट असा.
🌀२५) कृतज्ञ असा. लीन असा.
🌀२६) सुसमयी धम्माचे श्रवण करा.
🌀२७) मधुर भाषी, मितभाषी असा.
🌀२८) नेहमी श्रमणांचे दर्शन घ्या.
🌀२९) ब्रम्हचारी राहा.
🌀३०) चार आर्यसत्यांचा अंगीकार करा.
🌀३१) निर्वाणाचा साक्षात्कार करा.
🌀३२) वेळोवेळी धम्मचर्चा करा.
🌀३३) वैराग्य अंगी बाणा व तपस्वी व्हा.(देहदंड नव्हे)
🌀३४) निंदा, स्तुती, लाभ, हानी ह्या ऎहिक धर्माच्या सानिध्यात आल्यावरही चित्ताला अस्थिर होऊ देऊ नका. चित्तास निर्मळ हेवा.
*🌷👌🏻नमो बुद्धाय 👌🏻🌷*
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
 ☸☸☸☸☸☸☸☸☸☸

                   *।।पंचशील।।*
     
*1⃣ मी जीव हिंसे पासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*2⃣ मी चोरी करण्यातासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*3⃣ मी कामवासनेच्या अनाचारापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*4⃣ मी खोटे बोलण्यापासुन अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.*
*5⃣ मी मद्य,मादक तसेच इतर सर्वमोहांत पाडणार्या मादक वस्तुंच्या सेवनातासुन अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.*
------------------------------------------

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
             *🔵चार  सत्य🔵*
*1⃣ दुःख  :*
*मानवी जीवनात विविध स्वरुपात दुःख अस्तित्वात असते.*

*2⃣ दुःख समुदाय  :*
*दुःख तीव्र इच्छा व तृष्णेपासून निर्माण होते.*

*3⃣ दुःख निरोध  :*
*तीव्र इच्छा व तृष्णेला समूळ नष्ट करुन दुःखापासून मुक्तता होवू शकते.*

*4⃣ दुःख निरोगामिनी प्रतिपदा  :*
*दुःख मुक्तिचा मार्ग आहे. तो मार्ग आहे बुद्धांनी मार्गदर्शीत केलेला आर्य अष्टांगिक मार्ग.*
💠💠🔺💠💠🔺💠💠🔺💠💠
 
      *☸ अष्टांगिक मार्ग ☸*
           *(सदाचाराचा मार्ग)*

*1⃣💎 सम्यक दृष्टि  :- निसर्ग नियमा विरुद्ध कोनतीही गोष्ट होऊ  शकते ही गोष्ट न मानणे.*

*2⃣💎 सम्यक संकल्प  :-  म्हणजे योग्य निर्धार, विचार.*

*3⃣💎 सम्यक वाचा  :- करुणायुक्त व सत्यपुर्ण वाचा ठेवण्याचा प्रयत्न करणे.*

*4⃣💎 सम्यक कर्मांत  :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.*

*5⃣💎 सम्यक आजिविका  :- वाईट मार्गाने आपली उपजिविका न करता ती सन्मार्गानेच करणे.*

*▶💎 सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरीत नाश करणे.*

*7⃣💎 सम्यक स्मृती  :- तात्विक गोष्टींचे स्मरण करुन चित्तास ( मनाला) जागृत ठेवणे.*
*8⃣💎 सम्यक समाधी  :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दृष्ट प्रवृत्तीपासून मन् अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.*
▶▶▶▶▶▶▶▶▶

           *🔴 दहा पारमिता 🔴*
          *(शिल मार्ग)*

*🍁1) शिल  :- शील म्हणजे नितिमत्ता,वाईट गोष्टी न करण्याकडे  असलेला मनाचा कल.*
*🍁2) दान  :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता,रक्त,देह अर्पण करणे.*
*🍁3) उपेक्षा  :-  निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत रहाणे.*
*🍁4) नैष्क्रिम्य  :-  ऐहिक सुखाचा त्याग करणे.*
*🍁5) वीर्य  :-  हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पुर्ण करणे.*
*🍁6) शांति  :- शांति म्हणजे क्षमाशीलता,द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.*
*🍁7) सत्य  :- सत्य म्हणजे खरे,मानसाने कधीही खोटे बोलता कामा नये.*
*🍁8) अधिष्ठान  :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.*
*🍁9) करुणा  :- सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.*
*🍁10) मैञी  :- मैञी म्हणजे सर्व प्राणी,मित्र,शञूविषयी देखिल नव्हे तर सर्व जीवनमाञाविषयी बंधुभाव बाळगणे.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  ****जर आपण या तत्वांचा, शिकवणुकीचा आपल्या जीवनात अंगीकार केला , तर आपले अस्तित्व असताना नक्कीच आपण दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो व जीवंतपणीच
मुक्ति प्राप्त करु शकतो*. *बुद्धपौर्णिममेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!*

*🍀👌🏻सबका मंगल हो 👌🏻🍀.....🙏🏻🙏🏻🙏🏻*
*🙏🏻साधु ..... साधु ..... साधु .....🙏🏻*
साभार - नेट वरून 

टिप्पण्या

  1. खूपच समर्पक शब्दात बुद्ध विचार प्रगट केलेत . खूप छान

    उत्तर द्याहटवा
  2. भारत भूमीचे सर्वोत्तम भूमिपुत्र महाकारूनिक तथागत सिद्धार्थ बुद्ध जयंतीच्या मंगलमय कामना...💐

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...