नमस्कार मित्रांनो
आज आपण पाहणार आहोत कि परमेश्वरीय शक्ती जिचा उल्लेख नेहमी दैवी शक्ती म्हणून केला जातो अश्या व्यक्तिमत्वा बद्दल . दैवी शक्ती ज्याला मिळाली किंवा ज्याच्या जवळ आहे . अशी व्यक्ती अजून तरी मला दिसली किंवा भेटली नाही (भविष्यात कधी भेटल्यास सांगता येत नाही ). आणि दैवी शक्ती पाहिलेला व्यक्तीही अजून कोणी संपर्कात आला नाही. त्यामुळे जर मला कोणी कधी दैवी शक्ती ची व्याख्या करायला सांगितली , तर मी म्हणेल " एक अशी शक्ती जी सकारात्मक कार्य म्हणजे मानवी कल्याणाचे कार्य आपल्या अचाट सामर्थ्यांने करते तिला दैवी शक्ती असे म्हणतात".
वर सांगितल्या प्रमाणे मी माझ्या जीवनात जरी अश्या कोणत्या व्यक्तीला भेटलो नसलो तरी इतिहासात काही व्यक्ती असे नक्कीच भेटतात कि,त्यांच्या जवळ काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळी आलौकिक शक्ती होती. जिचा उपयोग त्यांनी लोकांच्या सुखासाठी व दुःख कमी करण्यासाठी केले. त्यांनी केलेले कार्य सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला झेपेल असे वाटते , पण दुरून डोंग💇र चांगला अशी म्हणण्याची पाळी येते. संत तुकोबा म्हणतात त्याप्रमाणे
" साखरीची चव मुंगी कैसी चाखे। जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे।।
कासवाची पीले दुध कैसे पीती। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
पाण्यातला मासा झोप घेतो कैसा। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
तुका म्हणे संत कैसे वळखावे आपण संत व्हावे तेव्हा कळे।। " (संत तुकाराम गाथा )
कासवाची पीले दुध कैसे पीती। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
पाण्यातला मासा झोप घेतो कैसा। जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे।।
तुका म्हणे संत कैसे वळखावे आपण संत व्हावे तेव्हा कळे।। " (संत तुकाराम गाथा )
तसेच ज्या ज्या व्यक्तीने असे अचाट शिवधनुष्य उचलायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना साधारण माणसाने किंवा समाजाने दैवी शक्ती लाभलेला म्हणून देवत्व प्राप्त करून दिले. यातील काही महापुरुष असे आहेत ज्यांनी प्रतिकूल परिस्थीतीत साध्या भोळ्या लोकांना धर्माचा सार असलेली ज्ञानगंगा साध्या , सरळ , रसाळ , सोप्या शब्दात त्यांच्यापर्यंत पोहोचवली. काही असे आहेत ज्यांनी जन्मापासून कधी दुःख पाहले नव्हते. सुखात सर्व सुख पायाशी लोळत असतांना या महापुरुषाने वैराग्याची परिसीमा गाठली व आपल्या मुलाचा , पत्नी, राज्य , धन , संपत्ती चा त्याग करून फक्त जगातील समस्त दुःख निर्दलनासाठी संपूर्ण जीवनसमर्पित केले. काही असे महापुरुष आहेत ज्यांनी स्वतःच्या जीवनाला मर्यादा लावल्या व त्या पाळण्यासाठी जीव गेला तरी चालेल पण वचन जाऊ नये म्हणून जीवन खर्ची घातले.
या व याहून कित्येक या वाटेने गेलेले महापुरुष या दैवी शक्तीने देवत्वाला भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले. जी गोष्ट समाजाच्या सुखाचे कारण होते तीच हि दैवी शक्ती . माझी मोहीम सुरु आहे आता आपल्यात जर कोणी असे दैवी शक्तीचे उपासक असतील तर त्यांना पाहण्याची ईच्छा आहे. पण सापडतच नाहीत खरं म्हणजे मी ऐकलेली शेवटचे दैवी व्यक्तिमत्व म्हणजे ' कर्मयोगी गाडगे बाबा ' .
काय ते वैराग्य आणि काय तो कर्मयोग हा रस्ताच खूप खडतर आहे. साधारण व्यक्ती या रस्त्याने चालायला सहजा सहजी धजत नाही. गाडगे बाबांचे संपूर्ण आयुष्यच खडतर तपश्चर्या आहे. त्यांच्या जीवनात खरं तर जगातील सर्व धर्माचे उच्च मूल्य सार रूपाने दिसून येतात. उच्च मानवी मूल्य आहेत. आणि किती उंच प्रगल्भता किती तो डोळस दृष्टीकोन . देव , धर्म , पाप, पुण्य, कर्मकांड याबद्दल गाडगे बाबांचे मनात कोणतीच शंका नाही. सर्व कसं जसं आहे तसंच कोणताच स्वार्थ नाही. साध्या सोप्या , वेळप्रसंगी अति परखड भाषेत समोरील श्रोत्यांना बापहो ! माया ! बहिनीहो ! म्हणत या कर्मयोगी संतान महान तत्वज्ञान समजून सांगितलं. जगतगुरु संत तुकोबांचे सोपे अभंग आपल्या वाणीतून कीर्तनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला समजावून सांगितले. सोबत नामजप होताच " गोपाला गोपाला, देवकीं नंदन गोपाला " असा हा संत दैवी शक्तीचे आलौकिक भंडार नक्कीच होते, कि शेकडो लोक कीर्तनात मंत्रमुग्ध होत असत . त्यांच्या वागण्यात कोणताच बडेजाव नव्हता . बाबा कोणाला पाया पडू देत नसत . कोणाच्या घरी पाहुणचार जेवत नसत . मिळेल ते खात आणि खापराच्या भांड्यात पाणी पीत असत. त्यांना दुसऱ्या पेक्षा आपण श्रेष्ठ असं दाखवण्याची भावना नव्हती
यामुळे मी एकतर नक्कीच शिकलो कि दैवी शक्ती असं काही जन्माने कोणाला मिळत नसते ( महाभारतातील धनुर्धर कर्ण अपवाद ..) . प्रत्येकाला जीवन निर्धारित करायचे असते आणि त्याची परम उंची जेव्हा गाठली जाते तेव्हा मग माझ्या सारखा सामान्य व्यक्ती एक नवीन संकल्पना जन्माला घालते व त्याला दैवी शक्तीचे नाव दिल्या जाते. परंतु जर स्पष्ट विचार केला तर लक्षात येते , कि त्या योग्यते पर्यंत पोहोचण्या साठी त्या महापुरुषांनी खूप मेहनत घेतलेली असते. त्यांचं खूप मोठं तप बलीदान त्या पाठीमागे असते आणि म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त होते. व साधारण सामान्य असलेला तो माणूसच माणसातला देव बनते .
समाजातील सुशिक्षित आणि प्रतिष्टीत लोक जेव्हा बुवा बाबांच्या पाय पडतांना दिसतात तेव्हा खरं तर त्या बुवा बाबांची कीव येते , कि किती तो ज्ञानाचा अहंकार . ज्ञानाचा अहंकार साधकाला भक्ती पासून दूर करतो . अशात स्वानुभव संपन्न गाडगे बाबांचं ते वाक्य जास्त समर्पक वाटते " माय बापहो माह्या कोनी चेला नाहि आन मी कोणाचा गुरु नाहीं ". आम्ही आज त्यांचे मंदिर बांधले अन विचार टाकले किती दुर्देव . खरंच ज्यांना गाडगे बाबांचा कर्मयोग समजला नाही तो दूर्देवीच .
आपला
नितीन मरकाळे
या व याहून कित्येक या वाटेने गेलेले महापुरुष या दैवी शक्तीने देवत्वाला भगवंत स्वरूपाला प्राप्त झाले. जी गोष्ट समाजाच्या सुखाचे कारण होते तीच हि दैवी शक्ती . माझी मोहीम सुरु आहे आता आपल्यात जर कोणी असे दैवी शक्तीचे उपासक असतील तर त्यांना पाहण्याची ईच्छा आहे. पण सापडतच नाहीत खरं म्हणजे मी ऐकलेली शेवटचे दैवी व्यक्तिमत्व म्हणजे ' कर्मयोगी गाडगे बाबा ' .
![]() |
| कर्मयोगी वैराग्यमूर्ती थोरसमाज सुधारक गाडगे बाबा |
यामुळे मी एकतर नक्कीच शिकलो कि दैवी शक्ती असं काही जन्माने कोणाला मिळत नसते ( महाभारतातील धनुर्धर कर्ण अपवाद ..) . प्रत्येकाला जीवन निर्धारित करायचे असते आणि त्याची परम उंची जेव्हा गाठली जाते तेव्हा मग माझ्या सारखा सामान्य व्यक्ती एक नवीन संकल्पना जन्माला घालते व त्याला दैवी शक्तीचे नाव दिल्या जाते. परंतु जर स्पष्ट विचार केला तर लक्षात येते , कि त्या योग्यते पर्यंत पोहोचण्या साठी त्या महापुरुषांनी खूप मेहनत घेतलेली असते. त्यांचं खूप मोठं तप बलीदान त्या पाठीमागे असते आणि म्हणूनच त्यांना देवत्व प्राप्त होते. व साधारण सामान्य असलेला तो माणूसच माणसातला देव बनते .
समाजातील सुशिक्षित आणि प्रतिष्टीत लोक जेव्हा बुवा बाबांच्या पाय पडतांना दिसतात तेव्हा खरं तर त्या बुवा बाबांची कीव येते , कि किती तो ज्ञानाचा अहंकार . ज्ञानाचा अहंकार साधकाला भक्ती पासून दूर करतो . अशात स्वानुभव संपन्न गाडगे बाबांचं ते वाक्य जास्त समर्पक वाटते " माय बापहो माह्या कोनी चेला नाहि आन मी कोणाचा गुरु नाहीं ". आम्ही आज त्यांचे मंदिर बांधले अन विचार टाकले किती दुर्देव . खरंच ज्यांना गाडगे बाबांचा कर्मयोग समजला नाही तो दूर्देवीच .
आपला
नितीन मरकाळे

Very nice Thought
उत्तर द्याहटवाम्हणजेच ईश्वरी गुण मणुष्यातच आहेत फक्त त्यावर षडरिंपूच घनदाट आवरण आहे,ते दूर करण्याची आवश्यकता आहे.लेख छान लिहीला आहे.
उत्तर द्याहटवाअतिशय समर्पक शब्दात देवत्वाची मांडणी केली,सुंदर लेख आहे।
उत्तर द्याहटवाछान अभ्यासपूर्ण व चिंतनीय लेख आहे. आपल्या पुढील लेखन कार्यास शुभेच्छा!
उत्तर द्याहटवा👌👍⚘
हटवाChhan
उत्तर द्याहटवाChhan. Nitin. Very. Good
उत्तर द्याहटवाखूप छान.
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाखुप सुंदर ������
उत्तर द्याहटवादेव कोण , दैवी शक्ती म्हणजे काय ? देव दगडात नाही तर माणसात आहे हे सांगणारे वैराग्यमूर्ती यांच्या बद्दल अचूक मांडणी छान ।
उत्तर द्याहटवालेखनशैली मस्तच....
उत्तर द्याहटवा