मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

भुमी परीक्षण

भुमी परीक्षण  प्रत्येकाला आपल्या स्वप्नातील घर सजवायला व बांधायला आवडत . आपलं घर जगापेक्षा वेगळं हटके असावं असं सुद्धा आपल्यातील बरेच जणांना वाटत . प्लॉट खरेदी करते वेळी वास्तुशास्त्रातील नियम आपल्या घराला लागु होतील का नाही हि भीतीसुद्धा असते. कधीकधी या पुरातन शास्त्राचा सल्ला न घेतासुद्धा बांधकाम केल्या जातात. बांधकाम केल्यावर मग मात्र निसर्गनियमानुसार फळ मिळतात. वास्तुशास्त्रात ज्या ठिकाणी घर बांधायचे आहे ती जागा कशी असावी किंवा ती जागा कशी निवडावी याविषयी विस्तृत सखोल माहिती उपलब्ध आहे.  जो भुखंड आपल्याला घर बांधकामासाठी खरेदी करायचा आहे त्याचे भु- परीक्षण वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. वास्तु दोष आढळल्यास घर बांधकाम करायच्या आधी उपाय योजना करावी. तसे न केल्यास आपल्याला अनेक समस्याना सामोरे जावे लागू शकते.  आनंदी वास्तु तेव्हाच कार्य करते जेव्हा आपले घर वास्तु नियमामध्ये असेल.  भु - परीक्षण कसे करावे ? वास्तुशास्त्र मध्ये अनेक प्राचीन ग्रंथातून याविषयी अनेक महत्वपूर्ण बाबींचा अभ्यास सांगितला आहे . भूखंडाचा आकार , मातीचा रंग , गंध , स्पर्श , चव यावरून भूमीचे विव...

Vastushastra करावे व करू नये Basic do and don't

Vastu shastra करावे व करू नये  नमस्कार वाचकहो आपण पाहणार आहोत कि , घरामध्ये जर वास्तुशास्त्राचे संपूर्ण फायदे घ्यायचे असल्यास काय करावे व काय करू नये . कष्टाने मेहनतीचे घर बांधलेले असते . त्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे प्रेम एकमेकाला मिळणे . व प्रत्येकाची आर्थिक , सामाजिक प्रगती होणेसाठी वास्तुशात्र गरजेचे असते .              आज आपण अश्याच काही गोष्टी माहित करून घेणार आहोत . या लहान लहान गोष्टीतून आर्थिक भरभराट मात्र नक्कीच होऊ शकते . कधीकधी या सर्व आवश्यक गोष्टी घरात आपल्याला माहित असतात पण आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करीत नसल्यामुळे मोठ्या वास्तुदोषांना सामोरे जावे लागते . रंग , आकार, दिशा यांचा एकमेकांशी असलेल्या संबंधातून प्रत्येक वस्तूचा वास्तु शास्त्रामध्ये घरात राहणाऱ्या व्यक्तीवर प्रभाव पडत असतो . म्हणून भगवत गीतेत श्री भगवान श्रीकृष्ण युक्त आहार विहाराचे महत्व सांगतात . चला तर मग जाणून घेऊया वास्तुटीप्स आणि आपणही आपली प्रगती करूया .  वास्तु उपाय  १) घराचे बाहेर तुळस नक्की लावावी .  २) तुळस समोर शुभ लक्षणांनी युक...

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...

शिवदिन विशेष ११ फेब्रुवारी

 शिवदिन विशेष  ११ फेब्रुवारी ११ फेब्रुवारी इ.स.१६५८ छत्रपती शिवरायांनी आरमार निर्मितीचा शुभारंभ केला. शिवराय हिन्दुस्थानातिल पाहिले आरमार निर्माते.ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते. ११ फेब्रुवारी इ.स.१६८१ किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना. मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.

देवाचा पसारा

देवाचा पसारा गाढ झोपेतही हृदयाचे स्पंदन चालू रहाणे, श्वासोछ्वास चालू रहाणे, पचनक्रिया चालू रहाणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे, शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे, अंतराळांतील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, बाळाच्या जन्माआधी मातेच्या स्तनात दूध निर्माण होणे, पिलासाठी आधीच चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, दोन डोळे,दोन कान, एक नाक, दोन ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय शंभर वर्षे सुध्दा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत रहाणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे, सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवते.  परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा.  अहंकार सोडून,निगर्वी होऊन आणि निःशंकपणे. ।जयाच्या बळे चालतो हा पसारा। ।नमस्कार त्या ब्रम्हतत्वा अपारा ।।

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips घर बांधकाम हाती घेते  वेळी नवीन बांधकाम  ( New Construction ) करताना हि काळजी घ्या .  १) सेप्टिक टॅंक उत्तर वायव्य  ( North west North NWN) या दिशेला घ्या .  २) उत्तर दिशेला  WC असू नये .  वायव्य  दिशेला चालेल .  ३) घर बांधकामात पूर्ण गृहपिंड ( Plinth ) चौरस किंवा आयताकृती असावा . plinth ला वेडावाकडा आकार नसावा.  Plinth ला cuts असल्यास बांधकाम करून प्लिंथ पूर्ण करावी .  ४) वास्तु दोष दूर करण्यासाठी  तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे . तोरण प्रशस्त असावे .  ५) आग्नेय  दिशेला चकाकणारी संगमरवरी किंवा शहाबादी फरशी बसवावी . शुभ्र असावी .  ६) नेऋत्य दिशेला पितळेची मूर्ती किंवा भांडे ठेवावे. मूर्ती पोकळ नसावी . भांडे रिकामे ठेऊ नये.  ७) नेऋत्य दिशेचा दोष घालविण्या साठी गोमेद रत्न चिकित्सा करावी.