आराम व विचार
झोप येत असल्यास झोप घेतलीच पाहिजे , कारण झोपल्याने थकलेल्या मेंदूला आराम मिळतो.
किंवा आपण म्हणू कि , शरीर व मेंदू थकला तर व्यक्तीला झोपेची आवश्यकता असते .
त्यामुळे शक्य तेवढा आराम घडावा म्हणून झोपणे गरजेचे असते .
मात्र झोपेतून आळस उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्यावी .
एखादया दिवशी केलेला आराम चालेल , परंतु ती नित्याची गोष्ट सवय करून घेऊ नये.
दिवसा झोपू नये व रात्री जागु नये .
दिवसा शरीर व मेंदू यांच्याकडून शक्य तेवढे कष्ट करून घ्यावे व रात्री आराम करावा.
ज्या कारणांसाठी दिवसा झोप घेतली ते कारण लक्षात ठेवा .
जर जास्त मोबाईल वापरून दिवसा झोपले तर परत झोपेतून उठल्यावर मोबाईल ला हात लावू नका .
मुड फ्रेश झाला असेल व उत्साह वाटत असेल तर मोबाईल शिवाय आपल्याला आवडणाऱ्या दुसऱ्या कार्यात स्वतःला गुंतून ठेवा.
संपन्नता या जगात फक्त शेतातील कष्टानेच शक्य आहे . भौतिक प्रगती मुळे शाश्वत सुख नष्ट झाले आहे. तसेही सुख कधीच शाश्वत नसते. परंतु संपन्नता तरी चिरकाल कुठे आहे. शेतात कष्ट करणारे हात कमी झाल्याचा परिमाण .
मनुष्याचे डोके म्हणजे एक गूढ विलक्षण मशीन आहे.
यामध्ये असलेल्या मेंदूत अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी नेहमी घडतात.
एकदा एखादा विचार आला कि , त्याच्याशी संबंधित चांगले वाईट विचारांची मालिकाच सुरु होते.
कधी कधी हे विचार मनातल्या मनात अगदी टोकाच्या पातळीवर जातात. यासाठी एक म्हण फार प्रसिद्ध आहे कि " मन चिंती ते वैरी न चिंती " वैरी वैरभाव दाखवण्यासाठी जे काही करू शकणार नाही ते मन आधीच आपल्याला कल्पनेने दाखवून देऊ शकते. म्हणून माणसाच्या डोक्यात नेमके काय विचार सुरु आहेत याचा नेमका बोध होणे जरा कठीण कार्य आहे .
ते आपले विचार थांबवून स्थिर स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होणे त्याहून कठीण आहे.
आपण दैनंदिन जीवनात पाहतो हे विचार केव्हा पण आपल्या सोबतच असतात.
रस्त्याने चालणाऱ्या व्यक्तीने जर थोडं मनात चालणाऱ्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला तर सहज लक्षात येते कि , पाऊला पाऊलावर विचार बदलत राहतात.
चांगले वाईट विचार सतत सुरु असतात.
आपण एखाद्या व्यक्तीला भेटायला जातो तेव्हा मनात हुरहूर , उत्सुकता , आकंठता , लगबग हे जे भाव आलेले असतात ते मनाने चित्रित केलेल्या सकारात्मक व नकारात्मक जे भाव आहेत त्यामुळेच .
मनात येणारे हे क्षणा क्षणाचे विचार कश्याने थांबतील याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
काही जास्त चांगले विचार जमा करायचे असतील तर जास्तीत जास्त लोकांशी ओळख करणे व वाढविणे गरजेचे आहे . प्रत्येक व्यक्तीचा मेंदू म्हणजे विचारांचे स्वतंत्र भांडार आहे . आपण जेवढे जास्त सकारात्मक व्यक्तींच्या सानिध्यात जातो तेवढेच आपले विचार आपल्या समोर नेहमी मांडत असतात . त्या विचारातून आपल्या वर प्रभाव असतो व आपले विचार घडतात. म्हणून चांगले चरित्र असलेल्या उत्तम विचारांच्या लोकांशी मैत्री करावी.
Nice article
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा