मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...

शिवदिन विशेष ११ फेब्रुवारी

 शिवदिन विशेष  ११ फेब्रुवारी ११ फेब्रुवारी इ.स.१६५८ छत्रपती शिवरायांनी आरमार निर्मितीचा शुभारंभ केला. शिवराय हिन्दुस्थानातिल पाहिले आरमार निर्माते.ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल“, हे शिवाजी महाराजांचे विचार होते. ११ फेब्रुवारी इ.स.१६८१ किल्ले नळदुर्गजवळ मराठी सैन्य तैनात. नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्तखानाशी मराठ्यांचा सामना. मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.

देवाचा पसारा

देवाचा पसारा गाढ झोपेतही हृदयाचे स्पंदन चालू रहाणे, श्वासोछ्वास चालू रहाणे, पचनक्रिया चालू रहाणे, खाल्लेल्या अन्नाचे रक्त निर्माण होणे, पृथ्वीतलावर पाणी निर्माण होणे, शरीरांतर्गत सर्व इंद्रियांनी शिस्तपूर्वक कामे करणे, अंतराळांतील प्रत्येक ग्रहगोलांनी भ्रमणकक्षा सांभाळणे, फुलांमध्ये सौरभ निर्माण होणे, बीजातून वृक्ष निर्माण होणे, बाळाच्या जन्माआधी मातेच्या स्तनात दूध निर्माण होणे, पिलासाठी आधीच चाऱ्याची सोय निर्माण होणे, एवढ्याशा स्वरयंत्रातून अब्जावधी वेगवेगळे ध्वनी निर्माण होणे, दोन डोळे,दोन कान, एक नाक, दोन ओठ यातून निर्माण होणाऱ्या अवयवांतून एवढ्या विविधता निर्माण होणे, मेंदूत लक्षावधी आठवणी मुद्रित होणे, एकदा चालू झालेले हृदय शंभर वर्षे सुध्दा दिवसरात्र अविश्रांत स्पंदत रहाणे, बोललेल्या स्वरांचे ऐकणाऱ्याच्या मेंदूत बरोबर अर्थ उमजणे, सर्वत्र परमेश्वराची सत्ता जाणवते.  परमेश्वर पहायचा नाही, ऐकायचा नाही, फक्त असा अनुभवायचा.  अहंकार सोडून,निगर्वी होऊन आणि निःशंकपणे. ।जयाच्या बळे चालतो हा पसारा। ।नमस्कार त्या ब्रम्हतत्वा अपारा ।।

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips

गृहसौख्यासाठी वास्तु उपाय Vastu Tips घर बांधकाम हाती घेते  वेळी नवीन बांधकाम  ( New Construction ) करताना हि काळजी घ्या .  १) सेप्टिक टॅंक उत्तर वायव्य  ( North west North NWN) या दिशेला घ्या .  २) उत्तर दिशेला  WC असू नये .  वायव्य  दिशेला चालेल .  ३) घर बांधकामात पूर्ण गृहपिंड ( Plinth ) चौरस किंवा आयताकृती असावा . plinth ला वेडावाकडा आकार नसावा.  Plinth ला cuts असल्यास बांधकाम करून प्लिंथ पूर्ण करावी .  ४) वास्तु दोष दूर करण्यासाठी  तोरण मुख्य प्रवेशद्वाराला लावावे . तोरण प्रशस्त असावे .  ५) आग्नेय  दिशेला चकाकणारी संगमरवरी किंवा शहाबादी फरशी बसवावी . शुभ्र असावी .  ६) नेऋत्य दिशेला पितळेची मूर्ती किंवा भांडे ठेवावे. मूर्ती पोकळ नसावी . भांडे रिकामे ठेऊ नये.  ७) नेऋत्य दिशेचा दोष घालविण्या साठी गोमेद रत्न चिकित्सा करावी. 

श्री लक्ष्मी गणेश यंत्र Sree Laxmi Ganesh Yantra

 श्री लक्ष्मी गणेश यंत्र देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांचा एकत्रित यंत्र असून याला महायंत्र असेही म्हणतात. गणेश यंत्राद्वारे सिद्धि प्राप्त होते आणि लक्ष्मीद्वारे एखाद्याला संपत्ती मिळते. शुभ लाभ यंत्र पूजाघरात (पूजा स्थळावर) रोख बॉक्समध्ये किंवा स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यावर अलमिरा येथे ठेवता येतो. श्री लक्ष्मी गणेश यंत्र अत्यंत शुभ आहे आणि देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या पूजेसाठी एकत्रित यंत्र आहे. लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे आणि भगवान गणेश, कोणत्याही कार्यात यशस्वी होणारी देवता. म्हणूनच श्री लक्ष्मी गणेश यंत्र हे नाव सूचित करते, ही नशीब, यश, संपत्ती आणि उत्पन्न आणि नफ्यात वाढ यासाठी एक यंत्र आहे. भगवान गणेश आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी प्रत्येक घरात श्री लक्ष्मी गणेश यंत्र स्थापित करावा अशी शिफारस केली जाते. श्री लक्ष्मी गणेश यंत्र केवळ आपल्या नशिबाचे दरवाजेच उघडत नाही तर आपणास सर्व आनंद व समृध्दी देईल. व्यापारी किंवा दुकानदारांनी त्यांची विक्री वाढवण्यासाठी श्री लक्ष्मी गणेश यंत्र त्यांच्या कार्यालयात किंवा दुकानात ठेवावा. https://amzn.to/3lcGwak

What is the true definition of a friend?

मित्र  मित्र न जोडण्याची किंमत काहींना आत्महत्या करून चुकवावी लागते.  माणसाला रक्ताच्या नात्यापेक्षा कोणीतरी निस्वार्थी पणाने समजून घेणारा व्यक्ती म्हणजे " मित्र " आवश्यक असतो. दररोज जीवनात अश्या खूप सगळ्या गोष्टी घडत असतात. ज्यांना वाट मोकळी करणे आवश्यक असते. सुखाच्या प्रसंगी आनंदात सहभागी होणारे भरपूर असतात. पण आपल्या आनंदात सहभागी होणारे सगळेच त्या सुखाने आनंदात सहभागी होत नसतात.              काहींचा नाईलाज असतो. ☺ मनात जे असते त्यांना बाहेर व्यक्त करता येत नाही. याच कारणाने फक्त ते आपल्या सोबत सुखाच्या क्षणी मागे पुढे दिसतात. अश्या वेळी आपला जिव्हाळ्याचा खरा मित्र शोधणे कठीण असते. तेव्हा सर्व जिवलग मित्र वाटत असतात.               मित्रांची खरी ओळख आपल्यावर आलेल्या संकट समयी होते. संकट कधीच एकटे येत नाही ते त्यामुळेच म्हणतात. कारण, संकट आले कि माणसाचे आप्त स्वकीय, मित्र मंडळी, कुटुंबीय यांची खरी ओळख होते. अश्या वेळी आपला मित्र ओळखणे फार कठीण नसते.        ...