मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

स्वभाव व वास्तु Your Nature and Vastu shastra


स्वभाव व वास्तु 

तुम्हीच तुमच्या घरात व स्वतःत काही बदल केल्यास खालील वास्तूटिप्स वापरात आणा . व आपल्या घरात सुख समृद्धी भरभराटी आणा . 
तुम्हीच व्हा, तुमच्या घराचे वास्तुतज्ञ
तुम्हीच व्हा, तुमच्या घराचे वास्तुतज्ञ

 पती - पत्नी

जिथे आपण सर्व एकत्र राहतो. आधार देतो. सुखदुःखे वाटून घेतो.
ती वास्तू फक्त आनंदी नसावी, समाधानी असावी.
आनंद हा भौतिक पातळीवर असतो, समाधान आत्मिक पातळीवर असते.
साखर, लिंबू, मीठ सारे आपापल्या आनंदात एकत्र रहातात. पण जेंव्हा ते एकमेकांत मिसळतात, तेंव्हाच विलक्षण मधुर चवीचे सरबत तयार होते. त्यासाठी लिंबाला कापून आणि पिळून घ्यावे लागते व मीठ, साखरेला विरघळून एकजीव व्हावे लागते.

म्हणून पती-पत्नी एकमेकांना अनुरूप असण्यापेक्षा एकरूप असावेत तसेच गृहमंदिरात पती-पत्नी मनाने एकरूप झाले, म्हणजे चवदार सरबत नाही तर मधुर अमृत तयार होते.

आपले आईबाबा एकमेकांशी किती प्रेमाने वागताहेत हे बघून मुलांच्या मनावर आणि शरीरावर अत्यंत शुभ परिणाम होतो. नाहीतर ती मनातल्या मनात कुढत राहतात.

मुले

मुले अनुकरणप्रिय असतात.
आईचा कडवट चेहरा, वडिलांचा आरडाओरडा घराचा उकिरडा करतो आणि वास्तुतज्ज्ञ समस्येच्या मुळाशी न जाता फक्त अतार्किक, अशास्त्रीय आणि बिनबुडाचे उपाय सुखवितो आणि निर्बुद्ध मंडळी त्यावर हजारो रुपये खर्चून मग पस्तावतात.
अरे कोणी बाहेरच्या माणसाने भरपूर पैसे घेऊन तुमच्या घरात शांती आणणे तुम्हाला शक्य वाटते का आणि पटते का
तुम्ही घरातली सर्व मंडळी समंजसपणे वागून, एकमेकांवर प्रेम करून वास्तू समाधानी ठेवू शकता. 

आदरणीय वृद्ध माणसे

 आदरणीय ज्येष्ठ नागरिकांना प्रकृती साथ देत असेल तर अर्थार्जन करून मुलांना हातभार लावावा.
रिटायर्ड लाईफ म्हणजे निष्क्रियता नव्हे.​
काहीही कारण नसताना सारखे लोळत पडलेली माणसे घरात हाॅस्पिटलचे वातावरण तयार करतात.
माळ घेऊन जप करणारी वृद्ध माणसेही आदरणीय वाटतात.
मुलांनीही जन्मभर कष्ट केलेल्या आई-वडिलांशी खूप नम्रतेने वागावे, त्यांच्या चुका काढत बसू नये.
सून म्हणून आपले सारे विश्व सोडून आपल्या घरी आलेल्या मुलीला खूप प्रेम आणि आधार द्यावा. ती खूप पुढारलेल्या वातावरणात शिकलेली आधुनिक मुलगी आहे. आपणच जनरेशन गॅप कमी करावी.
सुनेने सुद्धा सासरी साऱ्यांना असा लळा लावावा, की सून माहेरी गेली की सुनं सुनं वाटलं पाहिजे.

वाढदिवसाचा धांगडधिंगा

घरात मेणबत्या फुंकून आणि डोक्यावर कचरा पाडून घेऊन वाढदिवसाचा धांगडधिंगा करण्यापेक्षा मुलाचे निरांजन ओवाळून औक्षण करावे.
भोजनाचे वेळी आनंदी वातावरण ठेवावे.
पत्नी जेवली का विचारपूस करावी.
घरामध्ये सर्वांनी खूप संयमाने बोलावे.
एकमेकांच्या चुका पदरात घ्याव्या.
 एकजण चिडला तर दुसऱ्याने शांत बसावे.
गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो, तसे सारे शांत होईल.
चालतानाही घरात पाय आपटू नयेत.
शांतपणे वस्तू हाताळाव्यात.

​पुरुषांनीही घरात नीटनेटके राहावे.
बायकांनीच सदाफुलीसारखे टवटवीत राहावे ही, अपेक्षा बरोबर नाही.​

अशी राहते समाधानी वास्तु !

तुम्हीच व्हा तुमचे वास्तुतज्ज्ञ आणि करा आपली वास्तुदेवता प्रसन्न अन् समाधानी..

घरातील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हा मॅसेज जाऊ द्या आणि प्रत्येक घर सुखी समाधानी होऊ द्या. 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...