दुर्गा नवरात्र पहिला दिवस
शैलपुत्री माता
नवरात्र मधील मातेच्या नऊ रूपांपैकी शैलपुत्री मातेला भाविक भक्त प्रथम रूपात पूजा अर्चा करतात. नवरात्र मधील पहिला दिवस शैलपुत्री मातेचा असतो. नऊ दिवस विविध नऊ देवी रूपांचे दुर्गा पूजन भाविक करतात.
माता शैलपुत्री प्रथम रूपात पूजन केल्या जाते त्या आधी नवरात्र घटस्थापना केल्या जाते . शैलपुत्री मातेचे रूप असे आहे कि, माता नंदी वर विराजमान आहे. म्हणजे वाहन नंदी आहे . डाव्या हातात कमळ व उजव्या हातात त्रिशूल घेतले आहे. मातेच्या कपाळावर अर्ध चंद्र अलंकृत आहे.
" शैलपुत्री " या शब्दाचा अर्थ पर्वताची मुलगी असा होतो संस्कृत मध्ये पर्वताला शैल असेही म्हणतात. यासंबंधी असलेल्या पौराणीक कथा मध्ये सांगितले आहे कि , आधीच्या जन्मात शैलपुत्री माता दक्ष राजा ची कन्या होती. तिचे आधीच्या जन्मिचे नाव " सती " असे होते . सतीने घोर तपश्चर्या करून शिव शंकराला प्रसन्न केले होते . व त्यांनाच पती म्हणून स्वीकार केले होते . शंकराची अर्धांगिनी म्हणजेच माता सती होय. एकदा महाराज प्रजापती दक्ष यांनी एका महायज्ञ चे आयोजन केले. सर्व देवी देवतांना आमंत्रित करून व मोठा समारंभ करून सर्वांचे स्वागत केले. माता सती व भगवान शिव यांना या प्रसंगी आमंत्रित केले नाही. सतीला आपल्या वडिलांकडील या महायज्ञासाठी उपस्थित राहण्याची इच्छा उत्पन्न झाली . माता सतीने आपली इच्छा महादेवाला बोलून दाखवली. माहेरी जाण्यासाठी सतीने हट्टच धरला . भगवान शंकरानी मातेला विविध तऱ्हेने समजावून सांगितले तरी सर्व व्यर्थ . शेवटी नंदी ला (वाहन ) सोबत देऊन सतीला माहेरी जाण्याची विनंती शिवाने मान्य केली .
माता सती जेव्हा नंदीला सोबत घेऊन दक्ष राजा कडे गेली . तेव्हा तिला तिथे सन्मानाने वागणूक मिळाली नाही. दक्षाने तर उलट तिचा अपमान केला. सतीला वडिलांकडून झालेल्या तिच्या अपमानाचे काही वाटत नव्हते परंतु बाकी देवांचे जेव्हा पूजन सुरु होते तेव्हा देवाधिदेव महादेव यांचे स्तवन पूजन न करता त्यांना पूजेतून डावलण्यात आले. सतीला स्वतःच्या अपमानापेक्षा भगवान शंकरांचा अपमान जास्त जिव्हारी लागला. तिला आपल्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही . तिने शिवनिंदा सुरु असलेल्या त्या ठिकाणी योगाग्नी उत्पन्न केला व कुंडात आपले जीवन संपवले .
हि घटना जेव्हा शंकर देवाला समजली . त्यांना अतोनात दुःख झाले . त्यांनी त्या यज्ञाचा विद्वंस केला. तर अश्या प्रकारे मागील जन्मीची माता सती पुढच्या जन्मी हिमालयाचा राजा हिमावत व राणी हेमवती यांच्या राजमहालात जन्माला आली. हिमालयाची कन्या म्हणून मातेला शैलपुत्री असे म्हणतात. मातेचे वाहन वृषभ आहे त्यामुळे मातेला " वृषरूढा " सुद्धा म्हटल्या जाते.
मंत्र
ओम देवी शैलपूत्र्ये नमा!!
वन्दे वांछीतलाभाय चन्द्रार्धकृतशेखराम !
वृषारूढा शूलधरं शैलपुत्रिम यशस्वीनीम !!
गुरुकृपा वास्तुशास्त्र मार्गदर्शन अकोला कडून आपणाला नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Very nice blog. And continue writing to blog in Nine day of Navratra
उत्तर द्याहटवा