मुख्य सामग्रीवर वगळा

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

Change Furniture Arrangement for Better Vastu Result


घरातील वस्तूंची रचना बदला थोडं इंटिरियर change करा . कधीकधी विषम तत्वाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या वस्तू फर्निचर एका ठिकाणी ठेवल्या मुळे वास्तू दोष तयार होतात .  वास्तूला अनुकूल बनविण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपयोगी पडते. वास्तुदोष असल्यास घरात अनेक अडचणी, संकटे, दुःख, निराशा यांचे राज्य असते.
घरातील माणसे या दोषामुळे हवालदिल झालेली असतात. अशावेळी या वास्तुशास्त्राचे बोट धरून गेल्यास सुख, समृद्धी, समाधान घरात नांदते. म्हणून या शास्त्राचा कर्ता भगवान विश्वकर्मा याने हे शास्त्र आपल्या हवाली करून आपल्या जगण्याचा मार्ग सोपा केला आहे.
आधुनिक फ्लॅटसंस्कृती आता सगळीकडेच पसरली आहे. कप्पेबंद अशा या व्यवस्थेत वास्तू आपल्या आवडीनुसार, गरजेनुसार वा आपल्याला अनुकूल अशी असतेच असे नाही. अनेकदा त्यात वास्तुदोष असल्याचे समजल्यानंतर तिला अनुकूल बनविणे शक्य नसते. पैशांचा अभाव वा वास्तूची रचना ही त्याची कारणे असतात. पण अशावेळी निराश होण्याचे कारण नाही.
घरातील सामान, वस्तूंच्या जागा बदलून आपण वास्तुदोष काही मर्यादेपर्यंत नक्कीच कमी करू शकते. उदाहरणच घेऊ. वास्तुशास्त्रानुसार आग्नेय दिशेला स्वयंपाकघर हवे. तसे नसल्यास अग्नी आपल्याला अनुकूल रहात नाही.या परिस्थितीत घरातील फ्रीज, टीव्ही या इलेक्ट्रॉनिक वस्तू या दिशेला ठेवून आपण ती दिशा अनुकूल करून घेऊ शकतो. घराच्या पूर्व व उत्तर दिशेला काहीही ठेवायला नको. त्या रिकाम्या राहायला हव्यात. पण ते शक्य नसल्यास पूर्व वा उत्तर दिशेला ठेवलेल्या वस्तूच्या दीडपट वजनाच्या वस्तू नैरृत्य कोपर्‍यात ठेवल्या पाहिजेत. कारण नैरृत्य कोपरा जड आणि ईशान्य कोपरा हलका असला पाहिजे.
घरातील घड्याळ पूर्व किंवा उत्तर दिशेला लावले पाहिजे. असे केल्यास चांगला काळ आपल्या जीवनात येतो. त्याच्या आगमनाची प्रतीक्षा करावी लागत नाही. ईशान्य कोपर्‍याला कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवले पाहिजे. त्यासाठी तेथे पाणी भरलेला माठ ठेवायला हवा. त्याचा सकारात्मक परिणाम होतो. घरातील महत्त्वाच्या कागदपत्रांना पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवले पाहिजे. असे न केल्यास त्याच्याशी संबंधित काहीतरी अघटित घडते. अशाच प्रकारे बेडरूम, पूजेची खोली, तिजोरी, बाथरुम, ड्रॉईंग रूम, किचन, मुख्य दार, खिडकी यात बदल करून वास्तुदोष दूर करता येतो.
घरात वास्तुदोष आहे, असे समजताच काही लोक नवीन बांधकामाची तोड-फोड करताना दिसतात. परंतु तसे केल्याने वास्तुदोष नाहीसे होत नाही‍त. हा आपला गैर समज असतो. तो आधी मनातून काढून टाकायला हवा. खालील उपाय तुम्ही वापरून वास्तुदोष मुक्त होऊ शकतात.
आपल्याला आवडीच्या सुगंधित फूलांचा गुच्छ नेहमी आपल्या बेडरूममध्ये डोक्याच्या बाजूच्या कोपर्‍यात ठेवावे.
आपल्या शयनकक्षात खरगटी भांडी ठेऊ नये, कारण घरातील महिलांची वारंवार प्रकृती बिघडत असते.
कुटूंबात कोणाला भयानक स्वप्न पडत असतील तर झोपताना डोक्याशी गंगाजल ठेवावे.
कुटुंबात कोणी भयानक आजाराने पिडीत असेल तर चांदी पात्रात शुद्ध केसरयुक्त गंगाजल भरून ठेवावे.
घरातील पुरूष हे नेहमी मानसिक तणावग्रस्त असतील तर घरात तुपाचा दीवा लावून गुलाब अगरबत्ती लावावी.
शयनकक्षात झाडू नये. जर घरात नेहमी वादविवाद होत असतील तर उशी जवळ लाल चंदन ठेऊन झोपावे.
जर दुकानात नेहमी चोरी होत असेल तर दुकानाच्या पायरीजवळ पूजा करून मंगल यंत्राची स्थापना करावी.
दुकानदारीत मन लागत नसेल तर मुख्याद्वारच्या मागे किंवा पुढे श्वेत गणपतीची मूर्तीची विधिवत स्थापना करावी.
घरातील ज‍िन्याखाली बसून महत्त्वपूर्ण कार्य करू नये.
दुकान, फॅक्टरी, कार्यालय आदी ठिकाणी वर्षांतून एकदा तरी पूजा अवश्य करावी.
गुप्त शत्रु त्रास देत असतील तर चांदीचा नाग तयार करून करून झोपताना त्यांना पायाशी ठेवले पाहिजे.
नवीन जागी मन रमत नसेल, कोणत्याच कार्यात यश येत नसेल तर घरातील दारा खिडक्यांना पिवळ्या रंगाचे पडदे लावावेत.
घराला लागून असलेल्या घराच्या छतावर हळद थिंपळावी व ब्राम्हणास पिवळे वस्त्र दान करावे.
जर संतती सुख नसेल, मुलगा व वडील यांच्यात जमत नसेल तर सूर्य यंत्र मुख्यप्रवेशद्वारमध्ये ठेवून त्याची प्राणप्रतिष्ठा करावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे

 वास्तुशास्त्रानुसार घर कसे असावे.  नमस्कार ,  vastushastra नुसार घर बांधकाम करते वेळी बऱ्याच वेळा जागेच्या अभावी किंवा पुरेश्या ज्ञाना अभावी काही चुका घडून येतात . आपल्याला नेहमी प्रश्न पडतात कि ,  मी जिन्याखाली पूजा खोली बनवू शकतो? आरोग्यदायी जीवनासाठी झोपताना पुर्वेला व दक्षिणेला पाय करून झोपु नये . आपण कुठे व कसे झोपतो यावर आपले आरोग्य अवलंबुन असते. उत्त्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपावे म्हणजे आर्थिक,मानसिक,शारीरिक प्रगती चांगली होते. आजार बरे होत नसतील तर झोपण्याची  जागा बदलून  पाहा. म्हणजे आजार लवकरात लवकर बरा होईल. बेड समोर आरसा अथवा आरशाचे कपाट येऊ देऊ नये. त्यामुळे शरीरातील उर्जेची हानी होते व आजार वाढतात. आरोग्यदायी जीवनासाठी बॉक्स बेड वर झोपू नये बॉक्स बेड वर झोपणे म्हणजे आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. घरामध्ये सुख-समृध्दीदायक आयुष्यासाठी फुटलेले आरसे,फुटलेली खेळणी,तुटलेले फर्निचर इ .वस्तु ठेऊ नये . भरपूर प्रगतीसाठी आणि यशदायी गतिमान आयुष्यासाठी बंद पडलेले घडयाळ घरामध्ये ठेऊ नये . झोपताना घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेमध्ये बेड अ...

Direction in Vastushastra प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन

प्रमुख दिशा उपदिशा व दिक्क साधन वास्तुशास्त्र मध्ये दिशांना खूप महत्व आहे.  त्यामुळे दिशांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. त्यासाठी दिक्क साधनांचा उपयोग प्राचीन वैदिक काळापासून वास्तुशास्त्रात केला जातो . वास्तुशास्त्र मध्ये हि सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे , कि दिशा निर्धारित केल्या शिवाय कोणतेच कार्य करीत नाहीत. दिक्क साधन कोणते आहेत आणि त्यांचा वापर वास्तु शास्त्रामध्ये कश्या प्रकारे होतो हे आपण पाहणार आहोत. त्याआधी दिशांची थोडक्यात माहिती घेणे गरजेचे आहे.                वास्तुशास्त्र मध्ये प्रमुख आठ दिशा आहेत . त्यापैकी चार मुख्य दिशा आहेत व बाकीच्या चार उपदिशा आहेत . मुख्य दिशा आपण सर्वांना माहीतच आहेत कि , १) पूर्व २) पश्चिम ३) उत्तर ४) दक्षिण वास्तुशास्त्र कोर्स ऑनलाईन माध्यम -  मराठी, हिंदी, इंग्रजी अधिक माहिती साठी सम्पर्क ०८४०८९४३९९३  वास्तुशास्त्र नुसार दिशा उपदिशा व देवता  वास्तुशास्त्रामध्ये ४ चार उपदिशा आहेत. वास्तुशास्त्रानुसार असलेल्या चार मुख्य उपदिशा खालील प्रमाणे.  १) ईशान्य ( उत्तर - पुर्व )...

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा

वास्तुशास्त्रानुसार घराचा नकाशा व दिशा  घराचे वास्तुशास्त्र बांधकाम करते वेळी बऱ्याच नियमांचे पालन करणे गरजेचे असते. मित्रानो आपल्या सर्वाना माहीतच आहे कि वास्तुशास्त्रानुसार चार मुख्य व चार उपदिशा आहेत . मुख्य दिशेला केलेले बांधकाम शुभ समजल्या जाते. उपदिशेला जर प्लॉट चे तोंड असेल तर त्या प्लॉट ला विदिशा प्लॉट असे म्हणतात. ईशान्य दिशेचा असा विदिशा प्लॉट शुभ समजतात.  ईशान्य दिशा  Eshanya North East for Educational luck  साक्षात परमेश्वराची दिशा म्हणजे ईशान्य दिशा होय . पूर्व आणी उत्तर यांच्या मध्यावरील दिशा म्हणजे ईशान्य कोपरा होय वास्तुमधील हि जागा सर्वात महत्वाची आहे,  संतान, पुत्र, धन, कीर्ती, भोग, भाग्य, ऐश्वर्य, तपोबल, दैव , देवी देवतांचे आशीर्वाद, गुरु, एखाद्या क्षेत्रातील श्रेष्ठ पद अश्या शुभ गोष्टीची हि दिशा आहे १) आपल्या वास्तूमध्ये या जागी नेहमी शुद्ध पाणी , देवघर ,तलाव , विहीर अंतर्गत पाण्याचा साठा चालेल २) या जागी शक्यतो पांढरा किवा फिका पिवळा रंग द्यावा ३) ईशान्येला नेहमी उतार असावा ४) ईशान्ये च्या बाजूने प्रवेश असल्यास तिथे चप्पल काढू नये ५) य...