मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

दैवी शक्ती गाडगे बाबांची नितीन मरकाळे Talk

नमस्कार मित्रांनो                      आज आपण पाहणार आहोत कि परमेश्वरीय शक्ती जिचा उल्लेख नेहमी दैवी शक्ती म्हणून केला जातो अश्या व्यक्तिमत्वा बद्दल . दैवी शक्ती ज्याला मिळाली किंवा ज्याच्या जवळ आहे . अशी व्यक्ती अजून तरी मला दिसली किंवा भेटली नाही (भविष्यात कधी भेटल्यास सांगता येत नाही ). आणि दैवी शक्ती पाहिलेला व्यक्तीही अजून कोणी संपर्कात आला नाही. त्यामुळे जर मला कोणी कधी दैवी शक्ती ची व्याख्या करायला सांगितली , तर मी म्हणेल " एक अशी शक्ती जी सकारात्मक कार्य म्हणजे मानवी कल्याणाचे कार्य आपल्या अचाट सामर्थ्यांने करते तिला दैवी शक्ती असे म्हणतात" .                     वर सांगितल्या प्रमाणे मी माझ्या जीवनात जरी अश्या कोणत्या व्यक्तीला भेटलो नसलो तरी इतिहासात काही व्यक्ती असे नक्कीच भेटतात कि,त्यांच्या जवळ काहीतरी दुसऱ्यापेक्षा वेगळी आलौकिक शक्ती होती. जिचा उपयोग त्यांनी लोकांच्या सुखासाठी व दुःख कमी करण्यासाठी केले. त्यांनी केलेले कार्य सर्वसाधारणपणे सर्वसामान्य जनतेला झेप...

नितीन मरकाळे Talk on Vastushastra 1

वास्तुशास्त्र १ हडप्पा येथिल स्नानगृह  सिंधू नदीच्या खोऱ्यात भारतीय उपखंडात असलेली वास्तू आणि शहर रचना यांची विकासावस्था आढळून आली आहे. आतापर्यंत एक असा समज संशोधकांमध्ये होता, कि सिंधू संस्कृती साधारणतः ५५०० वर्ष जुनी असेल. परंतु आता एका नवीन शोधाद्वारे हे सिद्ध  करण्यात आले कि , हि सभ्यता साधारण पणे ८००० वर्ष आधीची आहे . म्हणजेच या प्रकारे भारतीय वास्तुशास्त्र आणि नगर रचणे ची परंपरा ८००० वर्ष इतकी आधीची असल्याचे दिसून येते.  संशोधकांनी दावा केला आहे कि , सिंधू संस्कृती मध्ये प्राप्त झालेले मातीचे भांडे ६००० वर्ष व त्याही आधीचे आहेत. हि सभ्यता भारतात सिंधू नदीच्या खोऱ्यात व त्यापासून पुढे सरस्वती नदी पर्यंत भारतातील खूप मोठ्या भूभागावर वास्तव्यास होती. सिंधू संस्कृती  खराब वातावरणामुळे येथील नागरिकांनी स्थलांतर  केले. शहरे रिकामी झाली.  धन्यवाद  नितीन मरकाळे  भ्रमणध्वनी- ८४०८९४३९९३ 

नितीन मरकाळे Talk

" भित्यापाठी ब्रम्हराक्षस " मनोरंजनासाठी दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीची प्रतिमा मलीन करणे म्हणजे अप्पलपोटे पणाचा प्राथमिक प्रयत्न होय . दुसऱ्या साठी पर्याय  बनून जीवन जगू नका , तर त्याला इतकं जवळ करा त्याच्यासाठी तुम्ही एकमेव पर्याय असायला पाहिजे . प्रत्येकाला दुसऱ्याच काय सुरु आहे कसं सुरु आहे. हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. अरे कधी कधी आपण आपल्यात पण डोकावून पहा . Correct करण्यासारखं बऱ्याच गोष्टी आपल्यात पण राहून गेल्या आहेत. Perfect होण्याचा प्रयत्न करा , स्वतः स्वतःचे निंदक व्हा .. मग पहा Success तुमच्या पासून खूप लांब नसेल.  एक आपल्या मराठी भाषेत म्हणं आहे . " भित्यापाठी ब्रम्हराक्षस " म्हणून कधीच विनाकारण भीती बाळगू नका . नवीन गोष्ट जर आपल्या मेहनत च्या पैश्याने घेतली व एखादा तिऱ्हाईत लबाड धुर्त माणसाने जर आपल्या मनात भरून दिले कि अमुक वस्तू तुझ्या साठी ठीक नाही तर असलेल्या परिस्थितीतून लांब पळायचे प्रयत्न करू नका. याउलट देवावर व आपल्या सत्कर्मावर विश्वास ठेवा. आपला कर्मयोग सुरु ठेवा. म्हणून कधीच विसरू नका .... " भित्यापाठी ब्रम्हराक्षस ". ...