मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रत्नाध्याय Gems Therapy in Vastu

झोपेतून उठल्यावर

झोपेतून उठल्यावर                                        वास्तुशास्त्रानुसार दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठल्यावर घरामध्ये देवाचे नाव स्तुती रूपाने घेण्याला विशेष महत्व आहे. सकाळी सकाळी ईश्वराचे चिंतन करावे . त्यासाठी खाली काही नित्य उपयोगी मंत्र व स्तोत्र देत आहे . याच्या नियमित वाचनाने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते . व घराला अध्यात्मिक ऊर्जा मिळते .  वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।  निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।। १ ।।  शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।  विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् । लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् ।  वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।। २ ।।  कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।  प्रणत्क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ।। ३ ।।  या कुन्देंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता ।  या वीणावरदंडमंडितकरा या श्वेतपद्मासना ।  या ब्रह्माच्युत्शंकरप्रभृ...

Vardhman Mahaveer

वर्धमान महावीर जयंती       मुळातच ख्रिस्त पूर्व ५२७ म्हणजेच जवळजवळ अडीच हजार वर्षापूर्वी कुंडलपूर येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. भगवान महावीर ज्या काळात जन्मले त्या काळात हिंसा, पशुबळी, जातिभेद यांचे मोठे प्रस्त होते. या सर्व प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर शांततेच्या मार्गाने संघर्ष केला. त्यांचे संपूर्ण जीवन त्याग, समर्पण आणि तपस्या यांनी ओतप्रोत भरलेले आहे. तसेच त्यांनी संपूर्ण विश्वाला अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रम्हचर्य आणि धर्म यांची शिकवण दिली. २४ वे तिर्थंकर भगवान महावीर यांचे जीवन आपल्याला वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात प्रेम, दया आणि अहिंसा आचरणात आणण्याची शिकवण देते. आंतर-बाह्य जगात शांततेचा उद्घोष करण्यासाठी अहिंसा या व्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही.  अशा या जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर यांना जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...!!

केलं तेवढं कमीच

केलं तेवढं कमीच   खूप जुनी गोष्ट आहे , एकदा एका गावात एक भला माणूस राहत होता . तो सर्वांच्या मदतीला धावून जात असे . असं समाजा कि हि त्याची सवयच होती . सवयच असल्या मुळे कोणी सांगो अथवा न सांगो तो जो कोणी संकटात दिसेल त्या साठी आपल्या हाती असलेले काम सोडून पडत सुटायचा . काही लोक त्याचे आभार मानत तर काही लोक हि त्याची सवयच आहे असं समजून साधं आभार पण मानत नसत . त्यामुळे त्याच्या अत्यंत जवळच्या मित्रांनी त्याला खूप वेळा समजावून सांगितले होते कि तुला जास्त या लोकांच्या कामी पडू नको म्हणून .        पण चांगल्या सवयी कितीही यातना देणाऱ्या असल्या तरी त्या माणसाला एक समाधान देऊन जात असतात . असच झालं एके दिवशी , एक लहान मुलगा विहिरीत पडला . तो या  भल्या माणसाला दिसला . याला त्या लहान मुलाची दया आली . तो विहिरीजवळ आला आणि क्षणाचा विचार न करता त्याने विहिरीत उडी घेतली . तो लहान मुलगा जिवाच्या आकांताने कासावीस झालाच होता . त्याला तर जणू देवच भेटला . या माणसाने मोठी धडपड करून त्या मुलाचे प्राण वाचवले .               आता ...

श्रीरामाची आरती

श्रीरामचंद्राची आरती उत्कट साधुनि उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी । लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी । देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय एव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला । लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता । म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता । आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥ अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार । अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार । नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर । सोहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर । माधवदासा स्वामी आठवे ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥

उन्हाळा आला उष्माघात टाळा

_*उष्माघात*_ *उन्हामुळे मृत्यू का होतो* ? आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? *आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे. पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं. - जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं. *शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!) - *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*. *रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच...